प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरेच्या अभियाञिकीच्या केमिकल विभागातील विद्यार्थ्यांची झाली शंभर टक्के प्लेसमेंट

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना मिळाली नोकरीची संधी

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी –लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांञिकी येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्या २०२५ बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळाले असून, हा विभाग आणि महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यशामुळे महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या ध्येयाला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली. 

 

केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील मिसाळ यांनी सांगितले केमिकल इंजिनिअरिंगच्या २०२५ मधील ४० विद्यार्थ्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुंबई, घरडा केमिकल लिमिटेड, मेकलाईड फार्मासिटिकल लिमिटेड, सिपला फार्मासिटिकल लिमिटेड, सोपान इंडस्ट्रीज लिमिटेड, मौज इंजीनियरिंग लिमिटेड पुणे, कॅलिक्स केमिकल्स अँड फार्मासिटिकल लिमिटेड, आरती फार्मा मुंबई, सन फार्मासिटिकल लिमिटेड, आई जी पेट्रोल केमिकल्स लिमिटेड आणि एपिटोम कंपनी यासारख्या नामांकित आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली. 

 

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विद्यार्थी हा सक्षम घडावा यासाठी कौशल्य विकास, व्यवस्थापन कौशल्य, प्रक्षेत्र भेटी, मुलाखात संवाद कौशल्य आणि माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना देतानाच औद्योगिक क्षेत्रात बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचे ज्ञान दिले जाते. यामुळे ग्रामीण विद्यार्थी हा परिपूर्ण होता.

 

संस्थेच्या माध्यमातून विविध कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्राबरोबर संलग्नता करार याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे साठी मदत होते. यामुळे केमिकल इंजिनिअरिंग विभागाने यावर्षी ही शंभर टक्के प्लेसमेंट ची परंपरा कायम राखली आहे.विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी केमिकल विभागाचे सर्व प्राध्यापक तसेच प्लेसमेंट समन्वयक प्रा. मनोज परजणे, प्लेसमेंटचे प्रमुख डॉ. अण्णासाहेब वराडे व प्रा. नितीन चव्हाण, प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी परिश्रम घेतले. 

 

 केमिकल विभागाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, डाॅ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी विशेष कौतुक केले आहे. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!