(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-अक्षय काळे
कोपरगाव – तालुक्यातील पोहेगांव येथे गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे व चोऱ्या वाढल्या आहे. दिवसाढवळ्या दरोडे टाकून व्यवसायिकांना जखमी केले जाते. हे केवळ कायमस्वरूपी पोलीस दुर्लक्षेत्र बंद असल्यानेच होत आहे. अवैद्य धंदे व चोऱ्यामार्यांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशन ने तातडीने पाऊले उचलावीत. गावात दिवसाढवळ्या नंग्या तलवारी दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांमध्ये पोलीस दुरुक्षेत्र सुरू नसल्याने भीती राहिली नाही.आता याविषयी जनतेचा उद्रेक होण्याअगोदर अवैद्य धंदे व वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोहेगांव पोलीस दुरुक्षेत्र तातडीने सुरू करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्यांनी निवेदन पाठवले आहे.
पोलीस दूरक्षेत्र सन 2009 पूर्वी घरफोड्या व अवैद्य धंदे रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वासराव नागरे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पोलीसदुरुक्षेत्र मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुरावर यश आले 2009 साली पोलीस दूरक्षेत्र सुरू झाले. 22 पोलीस कर्मचारी या कुरुक्षेत्राला मंजूर करण्यात आले होते.विना मोबदला ग्रामपंचायतीने 600 स्क्वेअर फुट हॉल यासाठी दिला.
तिथे पोलीस स्टेशनचा बोर्ड लावण्यात आला मात्र काही दिवस सुरू राहिल्यानंतर ते बंद करण्यात आले. पोहेगाव दुरुक्षेत्राला पोलीस नियुक्त दाखवून त्यांचा वापर इतरत्र ठिकाणी करण्यात येऊ लागला. केवळ तीनच वर्ष हे दुरुक्षेत्र चालू राहिले व नंतर बंद झाले. ते आजपर्यंत बंदच आहे.पोहेगाव हे बाजारपेठेचा गाव असल्यामुळे चोऱ्या वाढल्या. परिसरातील दोन एटीएम चोरट्याने फोडले. अवैद्य धंदे फोपावले. ग्रामस्थांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे सर्व टाळण्यासाठी व पोलीस दूरक्षेत्र सुरू होण्यासाठी तत्कालीन सरपंच अमोल औताडे व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपोषण व रस्ता रोको आंदोलन केली. तात्पुरत्या स्वरूपात तेव्हा दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत करण्यात आली मात्र ती काही दिवस राहिली नंतर मात्र हे पोलीस दूरक्षेत्र पुन्हा बंद राहू लागले .
शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने अपुरे पोलीस कर्मचारी असल्याचे कारण देत प्रत्यक्ष नियुक्त्या पोहेगावला करून त्यांचा वापर दुसरीकडे करण्यात येऊ लागला.आता पुन्हा परिसरात अवैध धंदे चोऱ्यामाऱ्या यांचा सुळसुळाट वाढला असून याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिर्डी पोलीस स्टेशनचीच असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मंगळवारी संध्याकाळी माळवे सराफ वर पडलेला दरोडा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगतो आहे. पोलीस दूरक्षेत्राला कायमस्वरूपी असलेले कुलूप यामुळेच या परिसरात अवैध धंदे वाढले आहे. जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. तेव्हा शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या हे पोलीस दुरुक्षेत्र तातडीने सुरू करावे. अवैद्य धंद्यांना आळा घालण्यासाठी पावले उचलावीत. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.
जाहिराती साठी संपर्क -9561336892