Uncategorized

साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – रयत शिक्षण संस्थेच्या श्री.गणेश विद्यालय गणेशनगर शाळेत दिनांक 17 जुलै गुरुवार रोजी अन्नदान श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे साईमहिमा ट्रस्ट शिर्डी व गुरुपुरम टीव्ही भक्ती महिमा चेन्नई यांचे सर्वेसर्वा प्रसादगणेश चेन्नईकर व धनशेखरणसाई यांच्यावतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग ,वह्या ,कंपास पेटी, पेन यांचे वाटप करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुंदर असे स्वादिष्ट मिष्टान्न भोजन देण्यात आले.

शालेय शैक्षणिक साहित्य व मिष्टान्न भोजन मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. प्रथमता विद्यालयाच्या वतीने या उपक्रमातील प्रमुख सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाचे अनिलकाका गाढवे यांनी विशेष कौतुक करून प्रसादगणेश व धनशेखरणसाई यांचे विशेष आभार मानून समाजामध्ये पैसा भरपूर आहे परंतु दानशूरवृत्ती नाही ही खरी दानशूरवृत्ती आज या महान व्यक्तींकडे असल्याचे पाहायला मिळाले आहे असे गौरव उदगार काढले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी हा उपक्रम सलग दुसऱ्याही वर्षी विद्यालयांमध्ये राबवल्याबद्दल प्रसादगणेश व धनशेखरणसाई यांचे अभिनंदन करून आभार मानले.

कार्यक्रमासाठी विद्यालयातील पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलकाका गाढवे, रांजणगावचे सरपंच सुनीताताई कासार, श्री सोपानकाका कासार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे पाटील ,जयाभाऊ कालेशेठ, वाल्मीकभाऊ गाढवे, योगेश माघाडे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!