
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – श्रमदान,परिसर स्वच्छता,आणि अनाथ मुलांना भोजन देत जलसंपदा मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थ्यांनी गंगाधर बाबा छात्रालय, गुहा या ठिकाणास भेट देऊन अन्नदान करण्यात आले. छात्रालयाचे व्यवस्थापक प्रकाश सपकाळ त्यांनी मंञी विखे पाटील यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन गंगाधर बाबा छात्रलयातील स्तुत्य उपक्रमांविषयी माहिती दिली. त्यांचे आम्हाला सदैव मार्गदर्शन राहिले असून नेहमी मदतीचा हात राहिलेला आहे.यानिमित्ताने त्यांनी या विखे कुटुंबाचे आभार व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले व विखे परिवाराचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती दिली. याप्रसंगी प्रा.नंदकुमार दळे, प्रा.वैशाली कडलग यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. बाळासाहेब गाडेकर यांनी केले व प्रा. रमेश थेटे यांनी आभार व्यक्त केले.
