प्रवरा शिक्षण संस्था

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामधील ४५ विद्यार्थीनींची प्रशिक्षणासाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

लोणी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय” म्हणून तिस-यांदा गौरविलेले एकमेव महाविद्यालय असलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये नुकत्याच धुत ट्रान्समिशन प्रा.लि., छत्रपती संभाजीनगर या कंपनीने प्रशिक्षणार्थीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीमध्ये महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागामधील ४५ विद्यार्थीनींना प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध झाली आहे, प्रशिक्षण कालावधीमध्ये सदर विद्यार्थीनींना विद्यावेतन, निवास आणि भोजनाची व्यवस्था कंपनीच्या वतीने केली जाणार आहे. ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे महाविद्यालयाचे कॅम्प संचालक डॉ.आर.ए. पवार यांनी सांगितले.

 

महाविद्यालयामध्ये पदवी स्तरावर कला, विज्ञान, वाणिज्य, संगणकशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी या शाखेअंतर्गत एकूण पदवी-२२, पद्व्युत्तर-१८ व संशोधन केंद्र-१० असे एकूण ५० पदवी, पद्व्युत्तर व संशोधन केंद्रांमध्ये अभ्यासक्रम चालविले जातात. तसेच_महाविद्यालयात ४० कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकविले जातात. वाणिज्य शाखेअंतर्गत बी.बी.ए. हा अभ्यासक्रम सुरु झाला आहे. महाविद्यालयामध्ये एकूण १० संशोधन केंद्रास विद्यापीठाची मान्यता आहे. या केंद्रांमध्ये १७२ संशोधक आपल्या संशोधनाचे (पीएच.डी.) कार्य करीत असून ३२ संशोधक मार्गदर्शक त्यांना मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेले १३ प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालयात यशस्वीपणे राबविले जातात. नवसंशोधक यांचेसाठी डिझाईन आणि इनोव्हेशन सेंटर ची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कंपनी सेक्रेटरी (कंपनी सरचिटणीस) या अभ्यासक्रमांचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. याकरिता महाविद्यालयाने कंपनी सेक्रेटरी- पुणे चाप्टरशी सांमजस्य करार केलेला आहे.महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक जिमनॅशियम हॉल, आऊटडोअर-इनडोअर हॉल व विद्यार्थी-विद्यार्थीनींकरिता स्विमींग पूल व ग्रीन जिमची सुविधा उपलब्ध आहे.महाविद्यालयामध्ये सुविधांनी युक्त मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध आहे.

 

संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटीव संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पोलिस भरती व आर्मी भरती पूर्व तयारी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन केले जाते. याचेच फलित आज दिसून येत आहे. महाविद्यालयामध्ये परिसरातील बेरोजगार व शाळाबाह्य युवकांबरोबरच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना रोजगारक्षम व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ज्ञान संपादन करता येते असे डॉ. पवार यांनी दिली.सदर प्रशिक्षणार्थीना संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. छाया गलांडे, डॉ. बबनराव आमले यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षण मुलाखती यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रा. मनोज परजणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. शांताराम चौधरी, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समितीचे डॉ. हरिभाऊ डुबे, एकनाथ सरोदे, आप्पासाहेब शेळके यांनी परिश्रम घेतले.

 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील, डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, संचालक डॉ. प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे. 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!