ऐतिहासिकभौगोलिकमहाराष्ट्रशैक्षणिक

कोपरगाव तालुक्यातील भास्करवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन

शिवनेरी किल्यास दिली भेट

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – तालुक्यातील भास्कर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील ५९ विद्यार्थ्यांसाठी नुकतेच शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीअंतर्गत शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वराज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्यात आले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे शिवनेरी गड-किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व इतिहासाबद्दल सविस्तर माहिती घेतली. स्वतः उत्स्फूर्त घोषणा देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. तसेच त्या पवित्र स्थळी विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या महाराष्ट्र गीताचे गायन करून इतिहासाविषयी आपली जाणीव व अभिमान व्यक्त केला.गड-किल्ल्यांची माहिती घेतल्यानंतर ५९ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्याच ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला.

तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री विघ्नहर गणपती, श्रीक्षेत्र ओझर येथे विद्यार्थ्यांना दर्शनासाठी नेण्यात आले. यासोबतच पुणे जिल्ह्यातील विविध धार्मिक तीर्थक्षेत्रांना विद्यार्थ्यांनी भेटी देत दर्शन घेतले असून या भेटींमुळे त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक ज्ञान अधिक व्यापक झाले.

अशा प्रकारच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन या शाळेच्या वतीने दरवर्षी केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये सातत्याने भर पडत असून गड-किल्ल्यांबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने भविष्यात त्याचा त्यांना निश्चितच लाभ होणार आहे.

या सहलीचे आयोजन मुख्याध्यापक विजय सोंजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शिक्षक मोहन महाजन, ज्योती टोरपे, सुदाम शिरसाट व अंकुश प्रधान यांनी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत सहलीस मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पार पडली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!