महाराष्ट्रराजकीय

सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले! 

देवेंद्र फडणवीसांकडे गृह, अजित पवारांकडे अर्थ तर एकनाथ शिंदेंकडे नगर विकास खाते 

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

अहिल्यानगर:- (ता.२१) – मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे.
खाते वाटप पुढीलप्रमाणे आहे..
चंद्रशेखर बावनकुळे – (महसूल)  राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) हसन मुश्रीफ – (वैद्यकीय शिक्षण) चंद्रकांत पाटील – (उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री)  गिरीश महाजन – (जलसंधारण विदर्भ, तापी, कोकण विकास, आपत्ती व्यवस्थापन) गुलाबराव पाटील – (पाणीपुरवठा) गणेश नाईक -(पर्यटन) दादाजी भुसे – (शालेय शिक्षण) दत्तात्रय भरणे – (क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय) शिवेंद्रराजे भोसले- (माहिती व तंत्रज्ञान) माणिकराव कोकाटे – (कृषी)
राज्यमंत्री :- माधुरी मिसाळ -(सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय,वैद्यकीय शिक्षण) आशिष जयस्वाल – (अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय,) मेघना बोर्डीकर – (सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा) इंद्रनील नाईक – (उच्च आणि तंत्र शिक्षण,आदिवासी विकास आणि पर्यटन) योगेश कदम – (ग्रामविकास, पंचायत राज) पंकज भोयर – (गृहनिर्माण)

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!