Uncategorized

श्रीरामपूर -खैरीनिमगाव रोडच्या धोकादायक वळणावर दुपारच्या सुमारास झालेल्या ॲम्बुलन्स व दुचाकीच्या अपघातात चितळी येथील एक युवक ठार!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी-साईनाथ बनकर 

 

श्रीरामपूर – श्रीरामपूर -कोपरगाव रस्त्यावर खैरीनिमगांव येथील साबळे वस्ती या ठिकाणी ॲम्ब्युलस – मोटारसायकल अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक माहिती  समोर आली आहे.

 

श्रीरामपूर रोडवर खैरी निमगाव येथील साबळे वस्तीनजीक असलेल्या धोकादायक वळणावर  आज शनीवारी (दि.१) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर मार्गांवरून येणारी ॲम्ब्युलस गाडी क्रं. (एम.एच १६ डी.पी ०३८५) आणि पल्सर मोटार सायकल क्रं. (एम. एच.१७ डी.डी ८०५३) या दुचाकीची व ॲम्बुलन्सची समोरासमोर धडक झाली असून संबंधित दुचाकीवरील तुषार भालेराव (रा.चितळी.राहाता)या युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

घडलेला अपघात इतका भयानक होता की या अपघातामध्ये दुचाकी चा अक्षरशः चुराडा झाला आहे.घडलेल्या घटनेमुळे चितळी सह खैरी निमगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर गावातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते निलेश परदेशी यांनी तात्काळ प्रसंग वधानराखून खाजगी ॲम्ब्युलसला संपर्क साधत तुषार भालेराव यास साखर कामगार हॉस्पीटल येथे पाठवण्यात सहकार्य केले.

 

जाहिरात

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!