ग्रामपंचायत भ्रष्टाचार

आदर्शगांव सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून न झालेले काम दाखवून केला १ लाख ७२ हजार रुपयांचा भ्रष्टाचार – ग्रामपंचायत सदस्य विकास पांडूरंग उभेदळ यांची थेट मंञालयात तक्रार!

ग्रामस्थांमधून संतापाची लाट..ग्रामपंचायतीतून भरले सरपंचांनी स्वतःचे घर..महिला सरपंचाच्या पतीचा आणि मुलाचा ग्रामपंचायती च्या कामात हस्तक्षेप दोषींवर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी! अधिकारी आले गोत्यात!

नेवासा फाटा –आदर्शगांव सुरेशनगर ग्रामपंचायत (ता.नेवासा) येथे १५ व्या वित्त आयोगातून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली विहिरीचा गाळ काढणे आणि जाळी बसविण्याच्या बनाव करून कुठलेही काम न करता सुरेशनगरच्या महिला सरपंच शैला कल्याण उभेदळ पती कल्याण उभेदळ यांनी मनमानी कारभार करून मुलगा – ग्रामसेवक आणि शाखा अभियंत्यासह ग्रामपंचायतीच्या शिपायाने संगणमत केले प्रत्यक्षात गावात न झालेले काम कागदोपञी दाखवले असून शासनाच्या पैश्याने आपले घर भरले आहे.

या झालेल्या गैरव्यवहारातून एक लाख ७२ हजार ३०० रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याबाबतची लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ यांनी थेट मंञालयात केलेली असून आदर्श गावात न झालेल्या कामाची रक्कम रुपये १,७२,३०० रुपये पुन्हा ग्रामपंचायत खात्यामध्ये वर्ग करावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे परंतु सरपंच ग्रामसेवक यांनी मात्र हात वर केले आहे..न केलेल्या कामांमध्ये बोगस रक्कम वर्ग करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुरेशनगर ग्रामस्थांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,आदर्शगांव सुरेशनगरच्या लोकनियुक्त सरपंच सौ.शैला कल्याण उभेदळ , सरपंच पती कल्याण दादासाहेब उभेदळ व सरपंच मुलगा विजय कल्याण उभेदळ यांनी ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या विहीरजवळच असणाऱ्या त्यांच्या स्व:ताच्या विहीरीतील पाणी केवळ ग्रामपंचायतीच्या विहीरीत एक दिवस सोडून गांवच्या ग्रामस्थांना असे नाटक रंगविले की,आपल्या गांवच्या सरपंचांनी अख्या गावाला स्व:ताच्या विहीरीतून पाणी पुरवठा केला असल्याचे दाखवून या विहीरीजवळच चक्क ग्रामस्थांना बोलावून घेवून आपला मोठेपणा करुन आपल्या छब्या काही माध्यमातून उमटविल्या गेल्या आणि तेच छायाचिञ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीचा गाळ काढणे आणि जाळी बसवणे असे ऑनलाईन पोर्टलला जिओ टॅगिंगद्वारे अपलोड करून ग्रामस्थांसमोर काम पूर्ण केले असल्याचे दाखविण्यात येवून अधिकाऱ्यांच्या संगणमतातून मोठा अर्थिक गफला केल्याचा प्रकार आदर्शगांव सुरेशनगरचे जागृत ग्रामपंचायत सदस्य विकास पांडूरंग उभेदळ यांनी सर्व पुराव्यानिशी मंञालयात तक्रार केल्यामुळे आता प्रत्यक्षात काम न करता खोटी रक्कम काढण्यात आलेली असतांना सदरील ही रक्कम पुन्हा ग्रामपंचायत खातेमध्ये जमा करण्याची मागणी केल्यामुळे अधिकारी वर्ग माञ प्रचंड अडचणीत सापल्याचा प्रकार सुरेशनगर येथे उघडकीस आल्यामुळे अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

ग्रामपंचायत सदस्य विकास पांडूरंग उभेदळ यांनी अ.नगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,कक्ष अधिकारी मुंबई मंञालय येथे तक्रार दाखल केली असल्यामुळे मंत्रालय विभागातून याची तत्काळ दखल घेवून नेवासा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सखोल चौकशीचे आदेश दिलेले असून गटविकास अधिकाऱ्यांनी आता नेवासा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी आणि पाणी पुरवठा शाखा अभियंता यांना चौकशीचे आदेश दिले असल्यामुळे सुरेशनगर गावांत न झालेल्या कामाची बिले काढण्यात आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ‘बाप दाखव अन्यथा श्राद्ध’ घालण्याची भूमिका पार पाडवी लागणार असल्यामुळे अधिकारी माञ प्रचंड गोत्यात आल्याचे विकास पांडुरंग उभेदळ यांच्या तक्रारीतून समोर आलेले आहे त्यामुळे आदर्श गांवात प्रत्यक्षात काम न करता सरकारी तिजोरीतील निधीचा भ्रष्टाचार करुन निधी हडपला असल्यामुळे अधिकारी काय कारवाई करणार? आणि सुरेशनगरचे ग्रामस्थ कसे आंदोलनाला सामोरे जाणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

 

कामाची मंजुरी १ लाख ३५ हजार ९३५ रुपये असतांना सरकारी तिजोरीतून सोडले गेले एक लाख ७२ हजार रुपये आणि गांवात चौकशीला शाखा अभियंता आले असता त्यांनी प्रत्यक्षात ऑन दी स्पॉट काहीच पाहिलेले नाही याचे छायाचिञही त्यांच्याकडे नाहीत आणि सरपंच – ग्रामसेवक आणि शिपाई यांनी साहित्य प्रमाणे मूल्यांकन केले याचे व्हिडिओ चित्रीकरणही ग्रामस्थांकडे असून ज्याने चोरी केली त्याच अधिकाऱ्याकडे तपास..?दुसरा अधिकारी चौकशीस देण्यास पंचायत समिती टाळाटाळ. करत असल्याचा प्रचंड रोष ग्रामस्थांमधून केला जात आहे तसेच चालू केलेल्या कामाचे माहिती अधिकार फोटो मागितल्यानंतर ते सन २०१४-१५ आणि २०२२ चे आढळलेले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांनी यावेळी बोलतांना सांगून सर्व पुरावे सादर केले त्यामुळे या कामाची चौकशी कॉलिटी कंट्रोल (गुण नियंञण) अधिकाऱ्यांमार्फत व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी करुन अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या भ्रष्टाचाराबाबत अमृत सुरेशराव उभेदळ आणि ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ यांच्यासह ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन मोठा भ्रष्टाचार उघड केलेला असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!