अहिल्यानगर जिल्हा

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘रुग्ण सुरक्षा व गुणवत्ता सुधारणा’ विषयावर सीएनईचे आयोजन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांच्या सहकार्याने ‘रुग्ण सुरक्षा व नर्सिंग व्यवस्थापनातील गुणवत्ता सुधारणा’ या विषयावर सातत्यपूर्ण नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे (CNE) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून १० क्रेडिट पॉइंट्स प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचा एकूण २१२ परिचारिकांनी लाभ घेतला.

 

रुग्ण सुरक्षा सुनिश्चित करणे, नर्सिंग सेवांमधील गुणवत्ता सुधारणे, रुग्णसेवेतील संभाव्य धोके कमी करणे आणि सुरक्षित व प्रभावी नर्सिंग व्यवस्थापनासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये अद्ययावत करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

 

या कार्यक्रमासाठी श्रीमती रिना जॉर्ज, प्राचार्य, सेंट ल्यूक कॉलेज ऑफ नर्सिंग आणि हॉस्पिटल, श्रीरामपूर यांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून निरीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “रुग्णांच्या सुरक्षिततेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी परिचारिकांनी रुग्ण सुरक्षा प्रोटोकॉल, अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे आणि गुणवत्ता सुधारणा प्रक्रियांबाबत आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. रुग्ण सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करूनच सुरक्षित, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण नर्सिंग सेवा प्रदान करता येते.”

 

या उपक्रमासाठी संस्थेचे प्रा. डॉ. अभिजित दिवटे सर, संचालक (वैद्यकीय), तसेच डॉ. रामचंद्र पडळकर सर, मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, अहिल्यानगरच्या मेट्रन श्रीमती. जया गायकवाड, तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका, उपप्राचार्या आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता औताडे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे या सीएनई कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

डॉ. योगिता औताडे, डॉ. आंब्रपाली संतोष, एन. ए. बी. एच. कोऑर्डिनेटर, प्राध्यापाक श्री. अमोल टेमकर, प्राध्यापक सौ. सलोमी तेलधूने, डॉ . कविता भोकनळ हे व्याख्याते म्हणून लाभले आणि खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमामुळे सहभागी नर्सिंग रुग्ण सुरक्षा, गुणवत्ता सुधारणा आणि सुरक्षित नर्सिंग व्यवस्थापनासंदर्भात परिचारिकांना अद्ययावत ज्ञान मिळाले. तसेच रुग्णकेंद्रित, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातील सर्व सहकारी श्री .राहुल कडू, श्री. अमोल अनाप , श्री गणेश घोलप , श्री. विशाल पुलाटे , श्री दिनेश मगर, श्री. प्रशांत अम्ब्रीत ,सौ. संपदा म्हस्के आणि स्नेहल घोडेराव यांनी विशेष सहकार्य केले. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून नर्सिंग व्यावसायिकांच्या ज्ञानवृद्धीला आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेला प्रोत्साहन मिळाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!