क्रीडाचितळी महाविद्यालय

चितळी महाविद्यालयाचा दीपक शिंदे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चितळी येथील विद्यार्थी दीपक रमेश शिंदे याने तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथे आयोजित स्पर्धेत दीपकने 70 किलो वजन गटात उत्कृष्ट खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या दमदार खेळामुळे राहाता तालुक्याच्या प्रथम खेळाडू म्हणून त्याची निवड झाली असून, आगामी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी त्याचा समावेश करण्यात आला आहे.

 

या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाठ, पर्यवेक्षिका अनिता सातव, विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच चितळी-जळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दीपकचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!