शैक्षणिक

चितळीगाव शाळेस ५ हजारांची देणगी; विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळीगाव येथे माजी शिक्षक कै. भाऊसाहेब बाबुराव यशवंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नितीन भाऊसाहेब यशवंत व न्यू इंग्लिश स्कूल, चितळी येथील उपक्रमशील शिक्षिका नयना नितीन यशवंत पगारे यांनी शाळेस ५,००० रुपयांची देणगी दिली. तसेच जिल्हा परिषद शाळा चितळीगावच्या वतीने देणगीदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

 

कै. भाऊसाहेब बाबुराव यशवंत हे 1970 च्या दशकात चितळी गावातील शाळेत प्रथम नियुक्त झाले होते. आजही त्यांचे विद्यार्थी त्यांच्या आठवणी जपून ठेवत असून त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करीत आहेत. त्यांनी त्यांच्या शिक्षकी पेशाच्या कार्यकाळात शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे.

 

या प्रसंगी आदर्श शिक्षिका अलका निर्मळ, स्वाती लबडे, श्रद्धा पाटील तसेच चितळी महाविद्यालयाचे संगणक शिक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक विश्वास टपळे, मिलिंद खंडीखोड, सचिन विधाते, सतीश पटारे, वाघ मॅडम, बागुल मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!