
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – गणेश कारखाना अडचणीत आला की पर्यायी कामगार व शेतकरी कसा अडचणीत येईल या दृष्टीने प्रयत्न आहेत परंतु सहकारातील बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांची युती भक्कम आहे कितीही आव्हाने आली तरी आपण सहकाऱ्यांच्या मदतीने पुरून उरू.आपल्या शेजारील प्रवरा कारखान्याने अनेक अडथळ्याची शर्यत निर्माण करुन ठेवली आहे प्रत्येक वर्षी गणेशला कर्ज न मिळण्यासाठी प्रयत्न असतो तसेच गणेशवर अनेक खोट्या केसेस दाखल केल्या गणेशचे आधुनिकीकरण करण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटला अडचणी आल्या परंतु या सर्वावर गणेश ने मात करत गणेशने आपले आधुनिकीकरणाचे काम पूर्ण केले असे प्रतिपादन श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक व मार्गदर्शक विवेक कोल्हे यांनी केले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे उपाध्यक्ष विजयराव दंडवते, माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक नारायणराव कार्ले, डॉ.एकनाथ गोंदकर, प्रभावती घोगरे, सुधीर म्हस्के, राहाता नगर पालिकेचे मा. उप नगरअध्यक्ष धनंजय गाडेकर, ऍड. पंकज लोंढे यांच्या सहसंचालक मंडळ, संगमनेर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, गणेशचे कार्यकारी संचालक बी.जी..शिंदे, कोल्हे साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, गणेशचे सेक्रेटरी नितीन भोसले यांच्यासह सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हे पुढे बोलतांना म्हणाले की गणेश परिसर हा संघर्षमय परिसर राहिलेला आहे कितीही आव्हाने आले तरी श्री गणेशाच्या मदतीने येणारा गळीत हंगाम हा इतिहासातील सर्वात उत्कृष्ट गळीत हंगाम होईल. मागील वर्षी उसाला तीन हजार रुपये भाव दिला होता कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद यांना तीन हजार रुपये भाव तर तालुक्या बाहेरील उसाला दोन हजार आठशे रुपये भाव गणेश देणार आहे.

या प्रसंगी शिवाजीराव लहारे, दादासाहेब सांबारे, नानासाहेब शेळके, वाल्मिक तुरकणे, रमेश गागरे, अशोक पठारे, सर्जेराव जाधव, अविनाश दंडवते, शरद कडू, भगवान नळे, उत्तमराव घोरपडे, दिलीप क्षीरसागर, लताताई डांगे, प्रा. लक्ष्मण डांगे, चंद्रभान धनवटे, संचालक भगवानराव टिळेकर, मधुकर सातव, बाबासाहेब डांगे, संपतराव चौधरी, शोभाताई गोंदकर, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, बाळासाहेब चोळके, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, विष्णुपंत शेळके, अरुंधतीताई फोपसे, अनिल गाढवे, कमलताई धनवटे, आलेशराव कापसे, ज्ञानदेव चोळके, जयराज दंडवते, विक्रम दंडवते, अनिल बोठे, रामचंद्र बोठे, सुभाष सदाफळ, विलासराव टिळेकर, राजेंद्र कोल्हे, शंकरराव जेजुरकर, संजय शेळके, संजय भवर सुभाष कापसे आदी उपस्थित होते. यावेळी गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी प्रस्तविक, सूत्रसंचालन सेक्रेटरी नितीन भोसले यांनी केले. तर आभार नानासाहेब नळे यांनी मानले.




