स्नेहालय संस्था अहिल्यानगर

“स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे १६ जानेवारी रोजी नगर मध्ये जगदीश काबरे यांचे “विज्ञानातून प्रगतीकडे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन”

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

अहिल्यानगर – सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि मराठी लेखक जगदीश काबरे यांच्या “गणित व विज्ञान” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे १६ जानेवारी रोजी नगरमध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेतील व्याख्यानाची दोन शंखले ठेवण्यात आलेली आहे. १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता विज्ञान प्रेमी व शिक्षकांसाठी आणि १७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पालक व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान होईल. 

 

या कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात, स्नेहालय पुनर्वसन संकुल, एमआयडीसी, अहिल्यानगर केले आहे. जगदीश काबरे हे “विज्ञानातून प्रगतीकडे” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी “विज्ञान” विषयावर ३६ हून अधिक मराठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यामध्ये ‘शून्याचा प्रवास’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. काबरे हे गणित आणि विज्ञान विषय शाळांमध्ये शिकवतात आणि त्यांचा मुख्य उद्देश तरुणांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करणे आहे.

 

 

त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे, त्यामध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विज्ञान प्रसारक’ पुरस्कार, ब्राईट संस्थेतर्फे “चार्वाक” पुरस्कार, ‘ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक’ आदी पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे कार्य विज्ञानाच्या प्रचाराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच सोबत स्नेहालय फौंडेशन सांगली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक सल्लागार धनंजय आरवाडे हे “बालहक्क आणि कायदे” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. स्त्री भ्रूण हत्या थांबवणे, स्त्री जन्माचे महत्त्व याची जागृती करणे, सबलीकरण, स्त्रियांच्यावर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार याचा विरोध करणे, अशा अनेक नैतिक व सामाजिक कार्य मागील दहा वर्षांपासून करत आहेत.

 

 

“कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९९७०१२४६३९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन शाळेच्या मानद संचालक राजेंद्र शुक्रे, स्नेहालय अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी यांनी केले आहे.

 

 

जाहिरात

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!