राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीरसामाजिक

ऐतिहासिक स्थळे संवर्धनासाठी युवकांनी जनजागृती करावी – प्रा.डॉ.सुरेश शिंदे

प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पुणतांबा (ता.राहाता) यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळ संवर्धन एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

पुणतांबा – महाविद्यालयीन युवकांनी अध्ययना बरोबर ऐतिहासिक स्थळे संवर्धनासाठी कार्य करावे, सामाजिक जनजागृती करावी, ऐतिहासिक स्थळा मुळे ग्रामीणभागात रोजगार वाढीला चालना मिळते म्हणुन युवकांनी पुढे येऊन सामाजिक कार्य करावे व यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास साध्य करावा असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश शिंदे यांनी स्वयंसेवकांना केले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पुणतांबा (ता.राहाता) यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळ संवर्धन एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा (दि.11) फेब्रुवारी रोजी श्री. क्षेत्र चांगदेव महाराज समाधी स्थळ पुणतांबा ता.राहाता येथे आज संपन्न झाली.येथे कार्यशाळा उदघाट्न प्रसंगी डॉ. सुरेश शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते.

 

ऐतिहासिक स्थळे संवर्धन कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयामधील 78 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे पहिले पुष्प इतिहास विभागाचे प्रा.नंदू सदाफळ यांनी ऐतिहासिक स्थळे संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित स्वयंसेवकांना अनमोल  मार्गदर्शन केले.दुसरे पुष्प महाविद्यालयाचे डी.ए धनवटे यांनी गडकोट किल्ले संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तिसरे पुष्प प्रा.खिल्लारी यांनी गुंफले व विध्यार्थीना मार्गदर्शन केले.

 

त्यापूर्वी सर्व स्वयंसेवकांनीचांगदेव महाराज समाधी स्थळ, काशिविश्वेक्षर मंदिर,मारुती मंदिर परिसरात श्रमदान केले. गवत काढले, नारळाची करावंटे,टाकून दिलेली हार व फुले, निर्माल्य संकलित करून त्याची विल्हेवाट लावली. भाविकासाठी पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली.

याकार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,मा ना राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य, संस्थेच्या सचिव सौ मिराताई काकडे, कोल्हार महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ हरिभाऊ आहेर,महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा.डॉ धनंजय धनवटे,श्री.विजय धनवटे आदींनी कौतुक केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुरेश शिंदे, प्राचार्य डॉ. अमीन सय्यद,प्रा बाबासाहेब म्हसे, प्रा.नंदू सदाफळ,प्रा.शामा धनवटे, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा.माधुरी मोकळ, प्रा.सिमा दळवी महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!