प्रवरा शिक्षण संस्था

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेगांवच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेध प्रज्ञाशोध परिक्षेत घवघवीत यश

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – नुकत्याच संपन्न झालेल्या लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत चणेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इयत्ता दुसरीच्या वर्गातुन कु.सायली रामेश्वर खेमनर ही जिल्ह्यात सहावी तर राज्यात अकरावी, कु.राम रोशन गुळवे जिल्ह्यात आठवा तर राज्यात तेरावा, कु.कार्तिकी गणेश खेमनर जिल्ह्यात तेविसावी तर राज्यात अठ्ठावीसावी, कु.शिवन्या लक्ष्मण गुळवे ही जिल्ह्यात तेवीसावी तर राज्यात अठ्ठावीसाव्या क्रमांकाने यश संपादन केले. तिसरीच्या वर्गातुन कु. समर्थ अनिल गुळवे जिल्ह्यात सोळावा तर राज्यात एकविसावा आणि कु. आदिती चांगदेव खेमनर ही जिल्ह्यात चोवीसावी तर राज्यात एकोणतीसाव्या क्रमांकाने घवघवीत यश मिळवुन उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच कु. अपेक्षा बिडगर, कु. वेदिका पाटोळे, कु. अनुष ढमक, कु. साधना गुळवे, अनुष्का बिडगर ह्या विद्यार्थ्यांनी देखील सदर परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान पटकवलेला आहे.

 

प्रथमच या परीक्षेत जिल्हा परिषद चणेगांव शाळेतुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी एवढे मोठे यश संपादन केले बद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. अनुभवी व मेहनती शिक्षक वर्ग यांचे जोरावरच सदर विद्यार्थ्यांनी एवढे मोठे यश प्राप्त केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. वरील विद्याथ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता सुलाखे, श्री.राजेंद्र जोशी, श्री.वाळीबा वाळेकर, सौ.पुजा बनगये यांचे बरोबरच शाळा व्यवस्थापन समितीने व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.  

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!