महाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर तालुक्याचा पुढील आमदार शिंदेसेनेचाच असणार – भाऊसाहेब चौधरी

श्रीराम रामनवमी निमित्ताने शहरातील थत्ते मैदानावर भरवण्यात आलेल्या खेळण्या पाळण्याच्या उद्घाटन प्रसंगीशिवसेना शिंदे गटाचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास!

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर – विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार दिला असता तर आज श्रीरामपूरचा आमदार हा भगव्याला व हिंदुत्वाला मानणारा शिवसेनेचाच असता अशी खंत व्यक्त करत पुढील आमदार हा मात्र शिवसेनेचाच असणार असा विश्वासही शिवसेना शिंदे गटाचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

 

श्रीराम रामनवमी निमित्ताने शहरातील थत्ते मैदानावर भरवण्यात आलेल्या खेळण्या पाळण्याच्या उद्घाटन प्रसंगी चौधरी बोलत होते.ते पुढे म्हणाले की,मुंबईत जेंव्हा जेव्हा अहिल्यानगरचा विषय निघतो तेंव्हा सागर बेग यांच्या नावाचा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामुख्याने काढत असतात.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकच उमेदवार न दिल्याने शिवसेनेची आमदारकी हुकली पण पुढे ही चूक न करता पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांची साथ शेवटपर्यंत देतात असे बोलून चौधरी यांनी सागर बेग यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे संपूर्ण राज्यभर बेग यांचे चालू असलेल्या धर्मकार्यास आता शिवसेनेची ताकद मिळाली असून त्यास बळकटी देण्याचे काम आपल्याला मिळून करायचे आहे असे चौधरी यांनी सांगून बेग यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

सागर बेग म्हणाले की, शहरातील श्रीरामनवमी निमित्त दरवर्षी भरणाऱ्या यात्रोत्सवात जिहादी लोकांना खेळण्या पाळण्याचे ठेके देण्याची गलिच्छ पद्धत सुरू झाली होती लावजिहादचे वाढत्या प्रकाराना अशा गर्दीच्या ठिकाणीच जिहादी मुसलमान खतपाणी घालत होते हिंदूंच्या अनेक मुली अशा गर्दीच्या ठिकाणीच लावजिहादच्या बळी ठरल्या आहेत हे प्रकार थांबवावेत म्हणून जास्त रक्कम मोजून हा ठेका आपण घेतल्याचे बेग यांनी सांगितले.याप्रसंगी बोलतांना भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे सचिव दत्ताभाऊ खेमनर यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चुकीच्या उमेदवाराला ताकद दिल्याने काँग्रेसचा आमदार निवडून आल्याचा आपल्या मनातील रोष व सागर बेग यांच्यावर असलेली निष्ठा उघडपणे व्यक्त केली.

सागर बेग यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा सत्कार राष्ट्रीय श्रीराम संघाचे खंदे कार्यकर्ते अशोक रामा उर्फ बाबु साळवे यांनी केला याप्रसंगी नगरसेवक श्रीनिवास बिहानी,शिवसेना जिल्हाध्यक्ष औताडे यांच्यासह असंख्य शिव सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!