प्रशासकीयमहाराष्ट्र

श्रीरामपूरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये नगरसेवक ‘ॲक्शन’ मोडमध्ये; नागरिकांच्या अडचणींचा तातडीने निपटारा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर – नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. नुकतेच निवडून आलेले नगरसेवक दीपक ओमने आणि बिट्टू कक्कड यांनी नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली.

(प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवकांनी पाहणी केली यादरम्यान घेतलेले छायाचित्र)

प्रभाग क्रमांक १ मधील घरकुल परिसरातील सार्वजनिक शौचालय व त्या परिसरातील स्ट्रीट लाईट मागील अनेक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी विशेषतः महिलांना शौचालय वापरण्यास जाताना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास नगरसेवकांना फोन करून समस्या कळवली.

श्रीरामपूर येथील प्रभाग 1 मधील घरकुल परिसरात तात्काळ स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करण्यात आली.यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक तसेच नगरपालिका कर्मचारी

तक्रार मिळताच नगरसेवक दीपक ओमने आणि बिट्टू कक्कड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान स्ट्रीट लाईट बंद असल्याचे, सार्वजनिक शौचालयात साफसफाई नसल्याचे तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले.यानंतर नगरसेवकांनी तात्काळ संबंधित लाईट कर्मचारी व सफाई कामगारांना फोन करून आवश्यक सूचना व आदेश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला प्राधान्य देत समस्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.

नगरसेवकांच्या या तत्काळ हस्तक्षेपामुळे नागरिकांच्या अडचणींचा निपटारा होऊन परिसरात सुरक्षितता व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!