Warning: Undefined array key "fourth-footer-widget-area_2" in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104

Warning: Trying to access array offset on null in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104
जळगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा सहकारी बँक वाकडी शाखेचे शाखाधिकारी प्रवीण वहाडणे यांचा सन्मान – ahilyanagarkhabarbaat.com
महाराष्ट्र

जळगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा सहकारी बँक वाकडी शाखेचे शाखाधिकारी प्रवीण वहाडणे यांचा सन्मान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वाकडी येथे प्रवीण वहाडणे यांची नुकतीच शाखा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी याच शाखेत कॅशियर पदावर साडेचार वर्षे सेवा देत बँकेच्या व्यवहारात शिस्त व कार्यक्षमता दाखवली. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर मिळालेल्या या बढतीचे स्वागत करत जळगाव ग्रामस्थ व जळगाव विविध कार्यकारी सोसायटीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.

जळगावातील चौधरी परिवाराचे भाचे प्रवीण वहाडणे यांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला.सोहळ्यात सोसायटीचे चेअरमन सुरेश औताडे व व्हाईस चेअरमन नारायण चौधरी यांनी त्यांना शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देवून गौरविले.यावेळी माजी संचालक भाऊसाहेब चौधरी,महेंद्र भंडारी,आसाराम राशींनकर,दिलीप चौधरी, बाळासाहेब चौधरी,अण्णासाहेब चौधरी,शिवाजी काळे, ज्ञानेश्वर वैद्य,अन्वर शेख, एम. टी. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!