Uncategorized

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धेत २६ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – सहकाराचे जनक आणि शैक्षणिक, औद्योगिक व सांस्कृतिक समूहाचे शिल्पकार स्वर्गीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धेत जिल्ह्यातील २६ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे या स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित केला जाणार असल्याची माहिती प्रवारा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र तुपे यांनी दिली आहे.

दरवर्षी पद्मश्री विखे पाटील जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या या ललित कला स्पर्धेत रंगभरण हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक विभागातील विविध गटात आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत राहाता,श्रीरामपूर,कोपरगाव,राहुरी, संगमनेर व अकोले तालुक्यातील सुमारे २६ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व कला साहित्य भेट म्हणून देण्यात आले.सदर बक्षिसाचे वितरण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती दिनी होणार आहे.

 

या स्पर्धेचा मुख्य पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते भव्य असा होणार आहे त्याची तारीख वेळ यथावकाश कळविण्यात येईल.असे स्पर्धेचे नियोजन प्रमुख राधाकृष्ण को-हाळे यांनी सांगितले आहे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील आणि शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी मार्गदर्शन केले. याकामी अध्यक्ष राजेंद्र तुपे,उपाध्यक्ष संतोष पुलाटे, सचिव संजय तुपे, राधाकृष्ण कोऱ्हाळे मच्छिंद्र जरे,किशोर आहेर मनोज पवार,नंदकुमार निकम, जितेंद्र बोरा व सर्व कलाशिक्षक बंधू- भगिनींनी विशेष परिश्रम घेतले व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.  

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!