
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता – शहरातील युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस येथे (दि.१९) जानेवारी २०२५ रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी समस्त विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राहाता तालुक्याच्या मुख्य ठिकाणी युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस गेल्या सात वर्षापासून राहाता येथे कार्यरत असून इयत्ता अकरावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करून घडवत आहे.चांगल्या शैक्षणिक दृष्टीकोनातून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या विश्वासाला युनिव्हर्सल कोचिंग क्लास पात्र ठरले आहे.मेडिकल इंजीनियरिंग फार्मसी ऍग्रीकल्चर अशा विविध प्रकारच्या शाखेमध्ये प्रवेश मिळविण्याकरीता (CET, JEE, NEET,) यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांचे तंत्रशुद्ध व सखोल मार्गदर्शन युनिव्हर्सल कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून केले जात आहे.(CET, JEE, NEET,)आदी परीक्षेत १०० टक्के निकालाची हमी युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस कडून विद्यार्थ्यांना व पालकांना दिली जाते.यामुळे संपूर्ण राहाता तालुक्यात अल्पवाधितच युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस ने आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला आहे.
‘युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस’ राहाता तालुक्यातील अग्रगण्य क्लासेस आहे.येथून मागील सात वर्षाच्या कार्यकाळात क्लासेसच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विविध शाखेत प्रवेश मिळाला आहे. सुसंस्कृत पिढी गुणवान विद्यार्थी, घडविण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सलची घोडदौड यशस्वीपणे सुरु आहे अशी माहिती युनिव्हर्सल कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.विशाल चौधरी प्रा.दीपक क्षीरसागर प्रा. सागर कल्हापुरे, प्रा.मच्छीद्र काळे यांनी दिली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे व संस्कृतीक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजित कार्यक्रमात आनंद लुटला युनिव्हर्सल क्लासेस सोबत चा प्रवास येथून मिळालेले तंत्रशुद्ध मार्गदर्शन आलेले सुवर्ण अनुभव विद्यार्थ्यांनी मनोगतामधून व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यां करीता स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी प्रा. विशाल चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
