
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – रामपूरवाडी (ता.राहाता) ग्रामपंचायतीच्या वतीने (३१ मे) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येवून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी रामपुरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. या कार्यक्रमाला सरपंच संदीप सुरडकर,उपसरपंच मंदाताई काळे, ग्रामसेवक प्रमोद कानडे, कार्याध्यक्ष बबनराव काळे, ग्रामसेवक सुभाष सांबरे, तसेच प्रतिष्ठीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावच्या स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यात उस्फुर्त सहभाग घेतला.यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिक युवकांच्या सहकार्याने स्मशानभूमीच्या परिसरातील झाडाझुडपांची छाटणी,कचरा साफसफाई करण्यात आली.या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती झाली आणि ग्रामस्थांनी या कामात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रसंगी रामपूरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील आरोग्य सेवेतील मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आशा सेविका ज्योती दीघे आणि प्रतिभा आग्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांनी कोरोना काळात, तसेच नियमित आरोग्य तपासण्या करून जनजागृती उपक्रमातील योगदान वाखाणण्याजोगे असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सरपंच संदीप सुरडकर, उपसरपंच मंदाताई काळे, ग्रामसेवक प्रमोद कानडे, कार्याध्यक्ष बबनराव काळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाश शेळके,योगेश सांबारे,रवींद्र अभंग,अशोक पवार, अविनाश लोंढे,पंकज पवार, चांगदेव जाधव, किरण म्हसे, बाळासाहेब शिनगर,संतोष कदम,पंचक्रोशीतील इतर मान्यवर उपस्थित होते.
