अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

संजीवनीच्या संचालकांनी बिपीनदादा कोल्हेंना दिली दुष्काळासाठी ५१ हजाराची मदत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – राज्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणांत बसत आहे, त्यातच आशिया खंडात अग्रेसर असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांनी हारतुरे सत्कार न स्विकारता दुष्काळग्रस्तांना मदत करा असे आवाहन केले होते त्यास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालकांनी ५१ हजार रूपयांची रोख रक्कम दुष्काळनिधी म्हणून बिपीनदादा कोल्हे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द करत सदिच्छा व्यक्त केल्या.

          प्रारंभी कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी दुष्काळाचे गांभीर्य लक्षात आणून देत त्यासाठी व्यक्तीगत तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतींने काय काय उपाययोजना करावयाच्या याची माहिती देत प्रशासनस्तरावर सुरू असलेले नियोजन आणि दुष्काळ आराखडा याची सविस्तर चर्चा केली. संचालक बाळासाहेब वक्ते प्रास्तविक करतांना म्हणाले की, आशिया खंडात ग्रामिण अर्थकारणाला बळ देण्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने सातत्यांने साथ दिली. त्या बँकेच्या संचालक पदावर काम करण्यासाठी बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली याचा तालुक्याला अभिमान आहे. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनांने शेतक-यांच्या तसेच साखर कारखानदारांच्या समस्या अडी अडचणी सुटण्यांस मोलाची मदत होणार आहे. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

        श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९७२ च्या दुष्काळात केलेले काम आम्हांला नेहमीच आदर्शवत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही १९८४ मधील दुष्काळास सामोरे गेलो, शेतक-यांकडील पशुधन जगविण्यांसाठी पावले उचलली, या दुष्काळात ११० दिवसांनी गोदावरी कालव्यांना आर्वतन आले याची आठवण त्यांनी करून दिली, दुष्काळाने होरपळलेली माणसं व जनावरे जगविण्यांचे काम केले, तर १९९२ मध्ये कोपरगांव तालुका पंचायत समितीचा तत्कालीन सभापती म्हणून दुष्काळात मोठे काम केले. पिण्यांच्या पाण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व रासायनिक प्रकल्प दोन महिने बंद ठेवुन कोपरगांव शहरासह पुर्व व पश्चिम भागातील गावांना पिण्यांचे मोफत पाणी पुरविले, पशुधन जगविण्यांसाठी मोफत चारा वाटप केला, गोर गरीबांना धान्य दिले, पाणी साठवणुकीसाठी प्लॅस्टीकच्या टाक्या दिल्या तेंव्हा हा सगळा अनुभव लक्षात घेता २०२६ मध्ये एल निनोच्या संकटांने निर्माण झालेला दुष्काळ भयावह आहे, त्यासाठी सर्व संचालकांनी कोपरगांव तालुक्यातील गांवोगांव जात धान्य गोळा करावे, पशुधनासाठी चाराउपलब्ध करण्यासाठी मोफत बियाणे पुरवले जात आहे त्यातुन शेतक-यांनी आताच उपाययोजना कराव्या, फेब्रुवारी मार्च मध्ये कोरडया पडणा-या विहीरींनी ऑक्टोंबर मध्येच तळ गाठला आहे, पाणी जपून वापरा, युवकांनी गांभीर्यपुर्वक वागावे तरच आपण या दुष्काळाचे संकट परतवुन लावु शकु अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जावुन त्यातुन विपरीत होवु नये ही काळजी सर्वांनी घ्यावी असे शेवटी बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.

           याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, आप्पासाहेब दवंगे, रमेश आभाळे, विलासराव माळी, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, निलेश देवकर, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, रमेश घोडेराव, प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांच्यासह विविध संस्थांचे ी माजी पदाधिकारी, उस उत्पादक सभासद, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी संचालक आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!