
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. व मित्र पक्षांच्या लोकसेवा आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांनी नेत्रदीपक यश संपादन केले. या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तसेच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी युवा नेते विवेक कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभास गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, वसंतराव लहारे,नारायणराव कार्ले पाटील, भगवानराव टिळेकर, बाबासाहेब डांगे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, संपतराव हिंगे, गंगाधर डांगे, मधुकर सातव, विष्णुपंत शेळके,अनिल गाढवे,आलेश कापसे, डॉ. एकनाथ गोंदकर, बलराज धनवटे यांच्यासह कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शिंदे साहेब, सचिव नितीन भोसले तसेच गणेश परिसरातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.




