महाराष्ट्रशैक्षणिक

वाकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत घवघवीत यश

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

वाकडी -राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वाकडी येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. नुकतीच केंद्रस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर राहाता येथे आयोजित तालुकास्तरीय वेशभूषा सादरीकरण स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम राखले आहे.

या तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी कु. सावी योगेश जोशी हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वाकडीच्या नावलौकिकात भर पडली आहे.

कु.सावीच्या या यशाबद्दल शाळेत आयोजित कार्यक्रमात वाकडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. रोहिणीताई आहेर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. अण्णासाहेब पा. कोते यांच्या शुभहस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन, परिश्रम व विद्यार्थिनीची मेहनत कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मेघाताई जोशी, उपाध्यक्ष सौ. होले ताई, माजी अध्यक्ष श्री. निलेश लहारे, मुख्याध्यापक श्री. दिवटे सर, कमिटी सदस्य श्रीकांत साबळे, दीपक वेताळ, सुनील खडके, तसेच श्री. भालके सर, ईडलवार सर, गिरी सर, श्री. घोडके सर, बी. एल. आहेर सर, सौ. गिरी मॅडम, कुमावत ताई आदी शिक्षकवर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कु. सावीच्या यशाचे कौतुक करून तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!