चितळी महाविद्यालयमहाराष्ट्र

चितळी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चितळी येथे भारतरत्न व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाट व पर्यवेक्षिका अनिता सातव यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

 

यावेळी उपशिक्षक रमेश हिवाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन गंगाराम कुंदे यांनी केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!