प्रवरा शिक्षण संस्थामहाराष्ट्र

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयतील ११ विद्यार्थ्यांची मॅकलाईड फार्मास्यूटीकल्स मध्ये निवड 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेतील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अकरा विद्यार्थ्यांची मॅकलाईड फार्मास्यूटीकल्स प्रा. लि .मुंबई मध्ये नुकत्याच झालेल्या परिसर मुलाखतीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निलेश दळे यांनी दिली आहे. 

 

 या अकरा विद्यार्थ्यांमध्ये वृषाली उबाळे, प्रतिभा धोंनार,वैभव डोळे,ऋषिकेश गवळी, साहील गायकवाड,अनिकेत गायकवाड, गौरव पुंडे , गोपाळ परिहार, योगेश आव्हाड,तेजस साखरे,विखे सौरभ इत्यादीचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवरा कृषि शास्त्र संस्थेचे संचालक प्रा डॉ उत्तमराव कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. यावेळी कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निलेश दळे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्था विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, जैवतंत्रज्ञान आधारित औद्योगिक कंपनी भेटी , कार्यानुभव उपक्रम इ. उपक्रमाचा समावेश होतो.   

 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले आहे. 

 

   प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचा विद्यार्थी हा केवळ शेती ज्ञान घेऊन नोकरी करणारा नव्हे तर नोकरीत देणारा ठरावा यासाठी मंत्री विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळावे यासाठी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरती संस्थेने विशेष भर दिला आहे. यामुळे येथे शिकणारा विद्यार्थी हा विविध कौशल्य अवगत करून हायटेक शेती, मार्केटिंग, बाजारपेठ, नवीन तंत्रज्ञान आणि बदलता शेती व्यवसाय याची माहिती त्याला प्रत्यक्ष कृतीतून मिळते असे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी सांगितले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!