
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता-चितळी रोड लगतच्या बोठे वस्तीच्या परिसरात घरापासुन अवघ्या २० वीस फुटावर मादा सिंह सदृश्य प्राणी निदर्शनास आला असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी अमोल बोठे व किरण बोठे यांनी केला असून.ही घटना (दि.३१)गुरुवारी रात्री साडे आठच्या दरम्यान घडली.अमोल बोठे यांना सिंह सदृश्य प्राणी घरापासून थोड्याच अंतरावर बसलेला दिसला त्यांना थरकाप सुटला त्यांनी जोरात आरोळ्या ठोकून मोठ्या भावाला घरातून बाहेर बोलवत घडलेली आपबीती सांगितली तोपर्यंत सदर प्राण्याने तेथून पोबारा केला.

सदर घटना घडल्यावर कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय साखरे,सविता थोरात,प्रतीक गजेवार यांनी ज्याही भागात या घटना घडल्या त्याठिकाणी घटनास्थळी भेट देवून नागरिकांशी संवाद साधून सत्यता पडताळणी करून घटनाक्रम जाणून घेत परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली प्रत्यक्षदर्शी अमोल बोठे यांनी पगमार्क असलेले ठिकान दाखविले मात्र तपासणीत ते पगमार्क सिंहाचे नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील पाच दिवसापूर्वी सदाफळवस्ती व बोरकरवस्ती येथे सिंह दिसल्याच्या घटनेचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सिंह दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.याबाबत राहाता तालुक्यातील बोठे-बोरकर-सदाफळ वस्तीतील स्थानिकांशी अधिक चौकशी केली असता सिंह दिसल्याचा दावा खरा असल्याचे त्यांनी सांगितले.बोरकर वस्ती ते बोठे वस्तीचे तीन किलोमीटर अंतर असून दोन्ही वस्त्यावर सिंह सदृश्य प्राणी दिसला असल्याचे नागरिकांनी माहिती देताना सांगितले. शुक्रवारी (दि.१) साडेपाच वाजेच्या दरम्यान बोठेवस्ती पासून एक किलोमीटर दूर असलेल्या आभाळे वस्तीवर देखील हीच मादा सिंह आढळून आल्याचे काही नागरिकांनी सांगितले.राहाता तालुक्यात पूर्वीपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून आजवर झालेल्या हल्ल्यात अनेक बळी गेलेले आहेत त्यात भर म्हणून मादी सिंहाचेही दर्शन झाल्यामुळे नागरिक दुहेरी संकटात सापडले असून यामुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे.

चुकीचे व्हिडिओ व्हायरल करू नका;वनविभागाचा इशारा!
कोपरगाव वनखात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाचारण करण्यात आले त्यांनी बोठेवस्ती- सदाफळवस्ती-बोरकरवस्ती परिसरात धाव घेवून प्रत्यक्ष पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना पायाचे ठसे देखील आढळून आले मात्र:सिंह सदृश्य प्राणी याठिकाणी आलाच नसल्याचे नमूद करत सिंह दिसल्याचा दावा सफशेल फेटाळून लावला असून सोशल मीडियावर गैरसमज पसरेल असे व्हिडिओ वायरल झाले असल्याचे सांगत ही सर्व अफ़वा खोटी असल्याचे नमूद केले आहे यापुढे कोणीही अश्या प्रकारचे चुकीचे फोटो,व्हिडिओ व्हायरल करून नागरिकांना भयभीत करण्याचा प्रयत्न केल्यास वनविभागाकडून कडक कारवाई केली जाईल असा सज्जड ईशारा देत असे काही घडल्यास तात्काळ कोपरगाव वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी केले आहे.
पाहिलेला प्राणी सिंहच!
राहाता येथून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास आटपून अमोल बोठे रात्री साडेआठ वाजता घरी परतले.ते हॅंडीकॅप असून त्यांना अंगणासमोर मोठा प्राणी बसला आहे तो मादा सिंहच असल्याचे त्यांचा निदर्शनास आले.यावेळी त्यांनी जिवाच्या आतंकाने आरडाओरड केली मोठे बंधू किरण बोठे यांना बाहेर बोलावले.तोपर्यंत प्राणी तिथून पसार झाला.सदर प्राणी मादा सिंहच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खबरदारी म्हणून घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असून मादा सिंह दिसल्याच्या दाव्यावर ते पूर्णपणे ठाम आहे त्यांनी सदर प्राण्याच्या पायाच्या ठस्याच्या फोटोचा पुरावा सादर केला असून कोपरगाव वनविभागाने परिसरामध्ये ड्रोनने गस्त घालून सिंह सदृश्य प्राण्याचा शोध घेवून तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




