प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरेच्या गृह विज्ञान महाविद्यालयांची ईशा पवार यांची पोषण तज्ञ निवड 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

लोणी – शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगणक आणि गृह विज्ञान महाविद्यालय लोणी येथील कु. ईशा विलास पगार हिची नाशिक जिल्ह्यात पोषण तज्ञ म्हणून नुकतीच निवड होऊन ती सेवेत रूजू झाली आहे, सध्या ती सध्या ती महाविद्यालयामध्ये एम. एस्सी फूड सायन्स न्यूट्रिशन मध्ये शिकत आहे अशी माहिती प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी दिली. 

महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षेबाबत माहिती दिली जाते मुलाखत तंत्र, करिअर संधी त्याचबरोबर विविध प्रक्षेत्र भेटीतून सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यावर महाविद्यालयाचा भर असतो त्या दृष्टीने महाविद्यालयांमध्ये सेवा सुविधा या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे. 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!