राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीर

सेवा हेच मानवी जीवनाचे परमकर्तव्य – ह.भ.प.अर्जुन महाराज तनपुरे

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

देवळाली प्रवरा-भारतीय जीवन तत्त्वज्ञानामध्ये सेवा हे परमकर्तव्य मानले गेले आहे. सर्व जीवमात्रांची आणि मानवी समाजाची आपल्या परीने सेवा करणे, हाच श्रेष्ठ मानवी धर्म आहे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सेवाधर्माचे व्रत आयुष्यभर पाळावे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र ताहाराबाद, ता- राहुरी येथील श्रीसंतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे यांनी केले.

अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबीर दि.०३ जानेवारी ते ०९ जानेवारी २०२५ या कालावधीत श्रीक्षेत्र ताहाराबाद, ता-राहुरी येथे श्रीसंतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेंद्र रावसाहेब साबळे पाटील आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वाती हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्याप्रसंगी ह.भ.प.तनपुरे महाराज बोलत होते.

 

स्वतःशी संवाद साधणे आणि संतांचा आदर्श समोर ठेऊन आपण आपले जीवन आपल्या समाजाच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी व्यतीत करणे यातून आत्मिक आनंद आणि मानवी उन्नती साधने सहज शक्य आहे. राष्ट्रीय सेवा योजना हे मानवी उन्नती आणि सेवाभावाचे सशक्त व्यासपीठ आहे, विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा अंगीकार करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा असेही ते पुढे म्हणाले.

  श्री.संतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री. बाळासाहेब मुसमाडे रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, व्यक्तिगत उन्नती, सामाजिक उन्नती याबरोबरच आध्यात्मिक उन्नतीसुद्धा आयुष्यासाठी गरजेची असते. ताहाराबाद सारख्या अध्यात्मिक आणि पवित्र भूमीत स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सात दिवस दिलेली सेवा त्यामुळेच महत्त्वाची आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ,. स्वाती हापसे म्हणाली की, राष्ट्रीय सेवा योजना हे माध्यम विद्यार्थ्यांना जीवनाचा अर्थ कळण्याचे आणि देशाची सेवा करण्याचे माध्यम आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्त्व विकास साध्य करावा.

 याप्रसंगी ताहाराबादचे सरपंच श्री. निवृत्ती घनदाट, उपसरपंच सौ. मोनालीताई बापूसाहेब जगताप, राहुरी कृ. उ. बा. समिती संचालक श्री. मारुतीराव हारदे पा., कुरणवाडी पाणीपुरवठा सदस्य श्री. सिताराम झावरे पा., विकास सोसायटीचे चेअरमन श्री. मारुतीराव झावरे पा., व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर औटी पा., तंटामुक्ती अध्यक्ष श्री. फिरोज शेख, माजी उपसरपंच श्री. नारायणराव झावरे पा. आणि पप्पुशेठ माळवदे, अंजाबापू गागरे, कामगार पोलीस पाटील श्री. किरणराव घनदाट, ग्रामविकास अधिकारी श्री. शिवाजीराव पटेकर, श्रीसंतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक श्री. सर्जेराव हारदे पा., जनसंपर्क अधिकारी श्री. प्रशांत कवडे उपस्थित होते.

 महाविद्यालयातर्फे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश मेहेत्रे, प्रा. दिनेश त्रिभान, प्रा. रागिणी टेकाळे-कदम, प्रा. महेश भोंगळ, प्रा. साबळे, प्रा. वाळुंज, प्रा. कडू, प्रा. मुसमाडे, प्रा. चंगेडे, प्रा. प्रिया मुसमाडे, प्रा. अक्षदा मुसमाडे, प्रा. डोळस, प्रा. बाचकर, प्रा. करपे, प्रा. संसारे, प्रा. शेख, प्रा. नवले, कार्यालयीन अधीक्षक श्री संजय कदम, श्री.सचिन रणधीर आणि श्री. रियाज शेख यांचे सहकार्य लाभले.

 

 

जाहिरात

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!