क्रीडामहाराष्ट्र

जळगावच्या यात्रेतील मानाची कुस्ती ठरली लक्षवेधी!

कुस्तीपट्टू दीपक सरोदे व किरण आरणे यांच्या रंगतदार कुस्तीने जिंकले ग्रामस्थांचे मन!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता -श्रीरामनवमीच्या निमित्ताने जळगाव (ता.राहाता) येथील जागृत देवस्थान रोकडोबा महाराज मासूम बाबा यात्राउत्सवाची (दि.६) भव्य कुस्तीच्या हंगाम्याने सांगता झाली.यावेळी विविध जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी जंगी कुस्त्याच्या हंगाम्यात सहभाग नोंदवला.

कुस्तीपट्टू दीपक सरोदे व किरण आरणे यांच्या समवेत जळगाव पंचक्रोशीतील समस्त ज्येष्ठ नागरिक..

स्व.नाथाजी लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ मानाची कुस्ती आयोजित करण्यात आली.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील दीपक सरोदे व नगर जिल्ह्यातील किरण आरणे यांच्यातली दंगल समस्त कुस्तीप्रेमीसाठी प्रमुख आकर्षण ठरली.दीपक सरोदे व किरण आरणे दोन्ही मल्लांच्या कुस्तीची खेळी बरोबरीची असल्याने सामना अटीतटीचा झाला.दोन्हीही कुस्तीपटूंना समान न्याय मिळण्यासाठी पंच व ज्येष्ठांच्या निर्णयानुसार बक्षिसाची विभागणी करण्यात आली.गणेशचे संचालक संपतराव चौधरी यांच्या हस्ते कुस्तीपट्टू दीपक सरोदे व किरण आरणे यांना मानाच्या कुस्तीच्या बक्षीसाचे वितरण करण्यात आले.

ग्रामदैवत रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्राउत्सव निमित्त आयोजित जंगी कुस्त्यांच्या हंगाम्याचे निरीक्षण करताना पंच व ग्रामस्थ..

यावेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष केला. दोन्हीही कुस्तीपट्टूंना खांद्यावर उचलून घेतले त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.रोकडोबा महाराज मंदिरात यात्राउत्सव कमिटीच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.कुस्तीचे पंच म्हणून शंकर चौधरी,गोपीनाथ चौधरी,रमेश चौधरी,किसन चौधरी,यांनी जबाबदारी पूर्वक काम पाहिले.श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पो.हे.कॉ.रामेश्वर ढोकणे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

ज्येष्ठ कुस्तीपट्टूंचा सन्मान करताना जळगावचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी पाटील यांच्यासह समस्त यात्रा उत्सव समिती अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सदस्य व  ग्रामस्थ..

याप्रसंगी किसान संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर चौधरी गणेशचे संचालक संपतराव चौधरी, यात्रोत्सव कमिटी अध्यक्ष दिलीप चौधरी, अॅड.अशोक वाघ,उपाध्यक्ष महेंद्र चौधरी,खजिनदार विजय चौधरी,पंडित चौधरी,विजय चौधरी,बाळासाहेब चौधरी किरण चौधरी रवींद्र चौधरी, बाबासाहेब चौधरी,प्रवीण चौधरी,गोरख चौधरी, संजय चौधरी,अण्णासाहेब चौधरी,सुधाकर चौधरी,बापूसाहेब चौधरी,योगेश पंडित,यांच्यासह आसपासच्या पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी युवक समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!