
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होण्यासोबतच शरीरात आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांमध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने मुलींच्या खो-खो तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. तालुक्यातील विविध शाळांमधील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील एकूण ३८ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक मकरंद कोऱ्हाळकर, सुभाष पाटणकर, राजेंद्र पाटणकर, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मोहसीन शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना सौ. रेणुकाताई कोल्हे यांनी शालेय जीवनात खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ अंगीकारल्यास त्याचा भविष्यात मोठा उपयोग होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी अरुण चंद्रे यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळता यावेत यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन दिल्याची आठवण करून दिली.
यावेळी कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, सुरेश सोनवणे, योगेश बिडवे, रिजवान पठाण, दिनकर मॅडम, आहेर सर, प्रा. सुनील कदम, नेंद्रे सर, गोपाळ सर, कोल्हे सर, वसावे सर, भोये सर, चांदर सर, वाघ सर यांच्यासह अनेक महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
या स्पर्धेत पंच व गुणलेखक म्हणून नितीन निकम, विठ्ठल वसावे, भोये, लतीफ शेख, राहुल रुईकर, राहुल जाधव, अशोक गायकवाड, पार्थ भिंगारे, मनमोहन लोहोकने व ईशान वरकड यांनी काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा मार्गदर्शक व तालुका क्रीडा समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख अनुप गिरमे यांनी केले. उपस्थितांचे आभार अध्यक्ष नितीन निकम यांनी मानले.



