सोनई

गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब – महानगर बँक निवडणूकीत सर्व जागा विजयी 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी राहुल राजळे

 

अहिल्यानगर – राज्यातील अगग्रण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या जीएस महानगर बँकेची सत्ता एकहाती खेचून आणण्यात गीतांजली उदयराव शेळके यांना यश आले.त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार एकूण मतदानाच्या ८० टक्के मिळवून विजयी झाले.या विजयामुळे गिंताजली यांच्या नेतृत्वावार शिक्कामोर्तब झाले आहे.

विरोधी सुमनताई शेळके यांच्या मंडळाला सभासदांनी नाकारुन गीतांजली शेळके यांच्या मंडळाला भरभरून मतदान देत साॅलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल वर मतांचा वर्षाव करत त्यांच्या ताब्यात बँक दिली. १८ जागांवर दणदणीत विजय मिळवताना गीतांजली शेळके यांच्या मंडळाची एक जागा आधीच बिनविरोध निवडून आली आहे.

गीतांजली शेळके यांच्यावर सभासदांनी मोठा विश्‍वास व्यक्त केल्याचेच यातून स्पष्ट झाले असून या एकतर्फी विजयाच्या त्याच शिल्पकार असल्याचे अधोरेखीत झाले आहे. संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदानासाठी ६९ हजार ४२१ मतदार पात्र होते. त्यापैकी रविवारी झालेल्या मतदानात १७ हजार ६८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार झालेले मतदान हे अवघे २५.४७ झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला.

 

 

 

ही निवडणूक केवळ मतांची नव्हती तर आपल्या परस्पर विश्वासाची आणि नात्याची होती सभासदांनी स्व.साॅलिसिटर गुलाबराव शेळके,स्व.ॲड उदय शेळके यांच्यावर जसा विश्वास दाखविला तसा माझ्यावर दाखविला त्यास पात्र राहुन सर्वांना सोबत घेत बँकेचा पारदर्शक कारभार करणार – गितांजली शेळके,पॅनल प्रमुख 

 

 

 विजयी उमेदवार-सर्वसाधारण मतदारसंघ- गीतांजली उदयराव शेळके, आडसूळ सचिन सीताराम,ढोले रविंद्र दत्तात्रय, गुंजाळ गणेश सावकार,कवाद भास्कर बाबाजी, खणकर सतीश अनंत,खोसे कुंदा भास्कर,खोसे मंगेश नारायण,कोठावळे श्रीधर कोंडीराम,लंके बबन भाऊ,पठारे संतोष किसन,शिंदे शंकर पांडुरंग, शिंदे पांडुरंग विष्णू,थोरात मंगलदास भाऊसाहेब महिला राखीव- गीतांजली उदयराव शेळके, वाढवणे छाया रामदास. इतर मागास- थोरात भिवाजी भागुजी.भटक्या विमुक्त जाती- जमाती- पालवे विलास दगडू.अनुसुचित जाती- जमाती- संतोष भाऊराव रणदिवे (बिनविरोध).

 

.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!