Uncategorized

निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरल्याबद्दल आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे ग्रामस्थांकडून आभार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – तालुक्यातील रांजणगाव,वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधील पाझर तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार कोल्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिले.

 

या निर्णयामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार असून विहिरींना पाणी उपलब्ध राहणार आहे. तसेच शेतकरी व नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देत तातडीने सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टळण्यास मोठी मदत झाली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!