कोपरगाव तालुका

कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयास तिन महिन्यापासुन पुर्ण वेळ रेंज फाँरेस्ट अधिकारीच नाही

कोपरगाव वनविभाग कार्यालयास तात्काळ पुर्ण वेळ अधिकारी नेमण्याची मागणी

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

कोपरगाव प्रतिनिधी – अक्षय काळे   

 

कोपरगाव – वन परिक्षेत्र कार्यालयाच्या रेंज फाँरेस्ट आँफिसर प्रतिभा पाटील यांची राजुर वन्यजीव विभागाकडे तिन महिन्या अगोदर बदली झाल्या पासून कोपरगाव कार्यालयास पुर्ण वेळ अधिकारी नसल्याने नागरिकांना मोठया अडचणी चा सामना करावा लागत आहे .

श्रीरामपुर,राहता,कोपरगाव तिन तालुक्याचा कार्यभार असणाऱ्या कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयास तिन महिन्यापासुन पुर्ण वेळ रेंज फाँरेस्ट अधिकारी नसल्याने नागरिकांच्या पशुधनास बिबट जंगली श्वावपदाच्या हल्याचा सामना करत आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने कोपरगाव कार्यालयास तात्काळ पुर्ण वेळ अधिकारी नेमण्याची मागणी तिन तालुक्याच्या कार्यक्षेत्रातुन होत आहे .

  आर एफ ओ पदाबरोबर कोपरगाव वनपाल यांच्या सह कार्यालयातील अकाऊंट क्लार्क शिपाई हे देखील पद रिक्त असल्याने सेवानिव्रुत्त कर्मचार्याच्या जिवावर कार्यालयाचा गाडा हाकला जात आहे. नागपूर मुख्य प्रधान सचिव कार्यालया अंतर्गत वनविभाग प्रशासकीय सेवेस पात्र असणारे अधिकारी कर्मचार्याची ट्रेनिंग डिसेंबर मध्ये पुर्ण झाल्या नंतर त्यांची वनविभागाच्या सेवेत नियुक्ती केली जाते.

 

महायुती शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणिस मंत्री मंडळात कँबिनेट वनमंत्री पदी गणेश नाईक यांची वर्णी लागल्याने त्यांनी वनविभागाच्या अपुर्या मानव ससांधनावर लक्ष टाकात प्रशासन गतिमान करण्याची गरज ओळखून किमान अधिकारी स्तरावरील रिक्त पदे तात्काळ भरण्याची गरज आहे. सातशे पंच्याशी हेक्टर राखीव वन क्षेत्रातील वन्य जीव व्रुक्ष संपदा संवर्धन व संरक्षित सुचितील वन्यजिव सरीसृप प्राण्यांच्या संरक्षणा बरोबर कार्य क्षेत्रातील ३० आरा गिरण्यावर लक्ष ठेवुन अवैध लाकुड तोड रोखण्याची जबाबदारी केवळ आठ कर्मचारी वर्गावर असुन नागरिकांच्या जिविता बरोबर पशुधनाची जंगली वन्य प्राण्या पासुन बचावासाठी नागरिकांच्या रोषाला नेहमीच सामोरे जावे लागते कोपरगाव श्रीरामपुर राहता कार्यक्षेत्रातुन महिण्यास जवळपास बिबट हल्याच्या पन्नास केसेस दाखल होतात वाय जे पाचार्णे यांचे कडे राहुरी वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत मोठ्या राखीव जंगलाची जबाबदारी अपुऱ्या कर्मचारी वर्गावर भागवण्याचे कार्य पार पाडावे लागत असल्याने कोपरगाव चा अतिरिक्त कारभार साभाळतांना नागरिकांच्या पशुधनाचे नुकसान करणारे बिबट प्राणी पिंजऱ्यात पकडण्यासाठी जिवावरची कसरत पार पाडावी लागते. तिन तालुक्याचे बिबट प्रवण अधिवास असणाऱ्या कार्यालयास पुर्ण वेळ रेंज फाँरेस्ट अधिकारी मिळण्याची मागणी वरील तालुक्यातुन होत आहे.

 

जाहिरात

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!