
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील वाकडी येथील आशुतोष श्रीकृष्ण शेळके यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी नुकतीच निवड झाली आहे.
त्यांनी आय.बी.पी.एस (इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन) या स्पर्धा परीक्षेमार्फत आयोजित झालेल्या भरती परीक्षेत त्यांनी जिद्द चिकाटी आणि अभ्यासाच्या बळावर त्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून मानाची संधी मिळवली आहे.
ते श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विष्णुपंत शेळके यांचे पुतणे आहे. परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल वाकडी पंचक्रोशीसह विविध स्थरावरून श्रीकृष्ण शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
