प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

भारताच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा संदेश देणारी योग साधना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जगात पोहचली आहे.मन स्वास्थ्य आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक असलेली योग साधना प्रत्येकाच्या दैनंदीन जीवनाचा भाग बनावी असा संदेश जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात अकरावा जागतिक योग दिन संपन्न झाला. शिर्डी मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक मंडलात योगा दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक महाविद्यालया मध्ये एकाचवेळी जवळपास ४० हजारांहून अधिक विद्यार्थी,शिक्षक आणि पालक आणि संस्थेच्या पदाधिकार्यानी आणि गावातील प्रमुख पदाधिकार्यानीआपला सहभाग नोंदवून योगसाधना केली. याशिवाय प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये योगा दिनानिमित्त योगा विषयी जनजागृती आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले.

संस्थेचे अध्यक्ष तथा पालक मंत्री मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी योग साधनेचा संदेश देताना सांगितले की,हजारो वर्षाची परंपरा भारताला या योग साधनेतून मिळाली.आनंदी जीवना बरोबरच मन:शांती आणि उतम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या योग साधनेन संपूर्ण विश्वाला आकर्षित केले.विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवल्यानेच आंतरराष्ट्रीय योगा दिन संपूर्ण जगात साजरा होवू लागला हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे यश असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

 

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने संस्थेच्या अंतर्गत येणार्या सर्व शाखांमध्ये योगा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य प्रा. सुनिल चोळके यांनी योग साधनेतील विविध प्रकाराच्या आसनाची तसेच प्राणायाम क्रियेची माहीती देवून, योगा विषय जनजागृती केली. 

 

मागील २० वर्षापासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून योगा साधनेच्या विषयात जनजागृती केली जाते. यासाठी संस्थेतील क्रीडा शिक्षकांना विशेष असे प्रशिक्षण देऊन संस्थेअंतर्गत ६५ योगा शिक्षक विविध ठिकाणी कार्यरत असल्याचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांनी प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध गावात योगाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेबरोबरच पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना, पायरेन्स, लोणी कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर या ठिकाणी देखील योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डॉ. आर.ए. पवार आदिसह विभाग प्रमुख उपस्थित होते. 

 

जागतिक योगा दिनानिमित्त बोलतांना डॉ.सुस्मिता विखे यांनी योगा आणि प्राणायाम हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. केवळ जागतिक योगा दिनानिमित्त योग आणि प्राणायाम करण्यापेक्षा सकाळी प्रत्येकाने आरोग्यासाठी योगा करणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून योगा आता घराघरात पोहचला आहे. या माध्यमातून प्रत्येकाचे आरोग्य सुरक्षित होत आहे. कोव्हीड संकटात ना. विखे पाटील यांच्या माध्यमातून कोव्हीड सेंटरमध्ये योगाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेले एकमेव कोव्हीड सेंटर हे प्रवरेचे होते.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!