
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हाच प्रवरेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून विविध उपक्रम शालेय शालेय पातळीवर सुरू असतात. यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच महिला पालकांचाही सहभाग हा महत्त्वपूर्ण आहे कारण मुलांच्या जडणघडणीत महिलांची भूमिका ही महत्त्वाची आहे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी केले.
श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु येथे शुक्रवारी महिला पालक स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. शाहीन शेख होत्या. यावेळी प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या प्राचार्या.सौ.भारती कुमकर डॉ. खाडे, रंजना पवार, ॲबॅकस च्या संचालिका अर्चना पाटील आदी सह महिला पालक तसेच विद्यालयाचे प्राचार्य के. बी. बारगुजे सर,उपप्राचार्य सौ. श्रद्धा वाणी , पर्यवेक्षक श्री अण्णासाहेब तांबे ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ घुगे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज डॉ.संदीप म्हस्के सर्व शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी -विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सरोदे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामध्ये संस्कारक्षम शिक्षणाबरोबरच सक्षम विद्यार्थी घडवण्याचं काम होत आहे यामध्ये पालकांचाही सहभाग वाढावा या उद्देशाने विविध उपक्रम हे सुरू असतात विद्यार्थी पालक आणि शिक्षक या त्रिसूत्री तूनच खऱ्या अर्थानं ग्रामीण विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते त्यामुळे शालेय उपक्रमामध्ये पालकांनीही सहभागी व्हावे असे सांगताना पाथरे येथील विद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुकही यावेळी केले.
यावेळी महिलांसाठी “चला पैठणी जिंकूया” हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये उखाणे स्पर्धा, शाळेविषयी मनोगत व्यक्त करणे, मनोरंजक खेळ,मनोरंजक प्रश्न ची मुक्त उत्तरे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विजेत्या स्पर्धकांना पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते भेट देण्यात आली या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी शाळेत अध्यापनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते पाहण्यास महिला पालकांनी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे सुञसंचालन राधाकिसन को-हाळे यांनी तर आभार सुनिता घोलप यांनी मानले.
