गुन्हेगारीमहाराष्ट्र

पाथर्डीत सुगंधी तंबाखू व मावा कारखान्यांवर धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, ३.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी शहरात मोठी कारवाई

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

पाथर्डी – शहरात अवैधपणे सुरू असणाऱ्या सुगंधी तंबाखू व मावा तयार करणाऱ्या तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली.या कारवाईत एकूण ३,९४,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी तीन ठिकाणी प्रत्येकी एक छापा टाकून ही कारवाई केली.

मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी शहरात ही कारवाई करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना तंबाखूजन्य पदार्थ तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.

चिंचपूर रोड येथे गणेश हारदे याच्या घरातून मावा तयार करणारी २ मशीन व सुगंधी तंबाखू असा १,२८,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खंडोबा माळ परिसरात रविंद्र लगड याच्या शेडमधून ४ मशीन व सुगंधी तंबाखू असा १,७२,१०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तर कसबापेठ येथून सुनिल शिंदे याच्या घरातून २ मशीन व ९४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, मात्र तो आरोपी फरार झाला.

तिन्ही ठिकाणी मिळून एकूण ८ मिक्सर मशीन, ७३.५ किलो सुगंधी तंबाखू आणि मावा असा एकत्रित ३,९४,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८८/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २७ (३) (डी), २७ (३) (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (श्रीरामपूर विभाग), नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष पथकाचे प्रभारी मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोसई राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेकॉ शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, संभाजी बोराडे आणि जालिंदर दहिफळे यांनी संयुक्तपणे कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!