प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा इंजिनीयरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची १३.८० लाख पॅकेजवर आंतरराष्ट्रीय कंपनीत कॉलेज प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी निवड! 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील येथील प्रवरा रुरल इंजिनीयरिंग कॉलेजमधील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या विद्यार्थ्यांची अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॉलेज प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे तर काही विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना १३.८० लाखाचे पॅकेज मिळाले आहे अशी माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.

 

प्लेसमेंटमध्ये निवड झालेल्या विद्यार्थांचा संस्थेच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुश्मिता विखे पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. यावेळी त्यांनी नोकरी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. मास्टर कार्ड, ग्लयाट सिस्टिम्स पुणे, एपितोम, मोज इंडस्ट्रीज पुणे आणि रिलायन्स मुंबई या अशा नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक कंपन्यांचा समावेश आहे तसेच आय.टी.क्षेत्र व कोअर इंजिनीरिंग पार्श्वभूमी असलेल्या आघाडीच्या व अग्रगण्य कंपन्याचा समावेश आहे. प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेजच्या केंद्रीभूत प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून या प्लेसमेंट केल्या जातात. या कंपन्यात निवड होण्यासाठी खडतर असे राउंड असतात. हे राउंड यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना नोकरीची संधी मिळाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली. 

 

यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट डॉ. आण्णासाहेब वराडे यांनी सांगितले की, प्रवरा रुरल इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत असल्यापासून विद्यार्थ्याना सॉफ्ट स्किल्स व ऍपटीट्युड टेस्ट ची जोरदार तयारी करून घेतली जाते, तिसऱ्या वर्षात मुलांचे मूल्यांकन केले जाते व जिथे कमतरता आहे त्यावर अधिक काम करून ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ची प्रक्रिया माहीत व्हावी यासाठी नामवंत कंपन्यांचे मनुष्यबळ अधिकारी यांचे वेबिनार चे आयोजन केले जाते, एखाद्या विशिष्ट कंपनीत निवड व्हायची असेल तर त्याची तयारी कशी करायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांना क्यू-सक्सिड व कोक्युब यासारख्या नामवंत कंपन्या द्वारे मूल्यांकन होते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना अजून कोणत्या बाबिंवर भर द्यावा लागेल हे समजते. तसेच त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी जाणे येण्याची व इतर सर्व सुविधा महाविद्यायातर्फे देण्यात येते.

सर्व प्रवरा रुरल इंजिनीयरिंग कॉलेजचे विद्यार्थी या प्रक्रियेतून जात असतात त्यामुळे पदवी अंतिम वर्षात शिकत असतानाच या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्वारे नोकरीची संधी मिळते असे सांगितले. विशेष बाब मागील वर्षात म्हणजे मेकॅनिकल, इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग व केमिकल इंजिनीरिंग विभागांचे १०० टक्के प्लेसमेंट झाले असून काही विद्यार्थांना एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,माजी खा डॉ. सुजय विखे पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुश्मिता विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. मनोज परजने सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

प्रवरेत शिक्षणासोबत विविध उपक्रम, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप याद्वारे परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतो, यामुळे हे यश आम्हा मुलांसाठी महत्वपुर्ण आहे. वरील सर्व उपक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल मंञी ना.विखे पाटील यांचे विशेष आभार – तेजस्विनी चिकने,विद्यार्थीनी

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!