
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील चितळी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर पिलगर यांची नुकतीच उपमुख्यध्यापकपदी बढती होवून नूतन माध्यमिक महाविद्यालय वावी (ता.सिन्नर ) याठिकाणी पदोन्नती मिळाली आहे.या पार्श्वभूमीवर चितळी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पर्यवेक्षक सुधाकर पिलगर यांचा गौरव करण्यात येवून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पर्यवेक्षक सुधाकर पिलगर यांनी रयत शिक्षण संस्थे मध्ये मागील तब्बल तीस वर्षांपासून प्रदीर्घ सेवा करत आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये ते चितळी महाविद्यालय मध्ये पर्यवेक्षक पदावर रुजू झाले होते.त्यांनी साडेचार वर्ष चितळी महाविद्यालय मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे सेवा दिली. शांत व संयमी स्वभाव असल्याने ते विद्यार्थ्यांचे प्रिय होते. पालक असो किंवा विद्यार्थी या सर्वांच्या महाविद्यालयीन स्तरावरील सर्व अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते.चितळी महाविद्यालयात शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते शिक्षक म्हणुन त्यांची ओळख आहे.पर्यवेक्षक पदावरून त्यांची पदोन्नती थेट उपमुख्याध्यापकपदी झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निवडीबद्दल रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, उत्तर विभागीय अध्यक्ष तथा आ. आशुतोष काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,प्रमोद तोरणे जळगावचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,गणेशचे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी, गणेशचे संचालक संपतराव चौधरी,स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ सदस्य शंकरराव चौधरी, जळगावचे उपसरपंच दिलीपराव चौधरी,दिपकराव वाघ सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य व उत्तर विभागीय सल्लागार समितीचे निमंत्रित सदस्य भाऊसाहेब मोरे,ॲड.अशोकराव वाघ,नितीन चौधरी,एलआर गायकवाड,शंकर नाना चौधरी, राजेंद्र चौधरी, दीपक वाघ, विक्रम वाघ चितळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव शिरसाठ ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती निर्मळ चितळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
