(अहिल्यानगर खबतबात वृत्तसेवा)
लोणी:(ता.२५) – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व प्रवरा कृषी शास्त्र संस्था अंतर्गत लोणी येथील कृषी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठात निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप महाले यांनी दिली.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी सामाईक चाचणी द्वारे घेतलेल्या परीक्षेत ऋतिका अनाप कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे वनस्पती शास्त्र, शिवानी कडू कृषी महाविद्यालय, लातूर येथे कृषी विस्तार शिक्षण, संकेत मोटे कृषी महाविद्यालय पुणे येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन ,कुराळे दिनेश याची डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन तर ईश्वरी अवशंक कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय , लातूर येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झालेली आहे.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्था विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी , मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने , कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी , कार्यानुभव उपक्रम,शेतकरी मेळावे इ.उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.सुश्मिता विखे पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे , प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप महाले आदींनी अभिनंदन केले.
