
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – मध्यवर्ती भागात मानसिक आजारी व्यक्तिची काळजी घेणाऱ्या कुटुंबातील माणसांसाठी एका दिवसाचे विनामूल्य शिबीर (दि.23) फेब्रुवारी 2025, रविवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे.या शिबिरात सायकियाट्रीस्ट डॉ.नीरज करंदीकर व डॉ.अशोक कराळे , मानसशास्त्रज्ञ डॉ.दिप्ती करंदीकर पुण्यातील एकलव्य फाउंडेशनचे स्वयंसेवक मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात मानसिक आजारासंबंधी शास्त्रीय माहिती, उपचारांविषयी माहिती,डॉक्टरांना काय माहिती द्यावी? सुधारणेसाठी घरचे लोक काय करू शकतात? मानसिक आजारी व्यक्तीशी कसे वागावे? तिला कसे समजून घ्यावे? तिला सुधारणेसाठी कशी मदत करावी? कुटुंबातील माणसांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? मानसिक आजार एकदा बरा झाल्यावर काय काळजी घ्यावी? एकलव्य फाउंडेशन आजारी व्यक्तिसाठी व कुटुंबातील काळजी घेणाऱ्या माणसांसाठी काय काम करते? याविषयी माहिती दिली जाईल.तसेच आपल्या प्रश्नांनाही उत्तरे देण्यात येतील.
शिबिरासाठी नावनोंदणी करण्यासाठी 7040205175 किंवा 9225575432 या क्रमांकावर संपर्क साधावा. नावनोंदणी केल्यावरच शिबिराला प्रवेश मिळेल.हे शिबिर पुण्याचे एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ व अहिल्यानगरचे स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राज फाउंडेशनच्या आर्थिक साहाय्याने होत आहे.
