धार्मिक

रामपूरवाडी (ता.राहाता) येथे श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आ.आशुतोष काळे,युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रामपूरवाडी ता.(राहाता) येथे सालाबादाप्रमाणे श्री.दत्त महाराज,श्री.कालभैरवनाथ व श्री.मारुतीराया यांच्या कृपेने श्री.रामनवमी निमित्त यात्राउत्सव २०२५ तसेच अखंड हरीनाम सप्ताहाबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर यांनी दिली.

राहाता तालुक्यातील रामपूरवाडी येथील जागृत देवस्थान श्री.मारुतीराया यांची मूर्ती.

 

रविवार (दि.६) सकाळी ७ वाजता मंदिरातील मूर्तीला अभिषेक करण्यात आला दुपारी ४ वाजता गावातील डफाचा कार्यक्रम झाला आहे सकाळी १० ते १२ वाजता समस्त रामपूरवाडी भजनी मंडळा च्या सहकार्याने भजन कार्यक्रम पार पडला असून संध्याकाळी ६ वाजता पुणतांबा येथील जाधवराय महाराज यांची सवारी निघणार आहे रात्री ८ वाजता फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. सोमवार (दि.७) घोडा बैल शर्यत तसेच बुधवार (दि.९) नामवंत तमाशा मास्टर नाना सोनवणे सह सौ. कल्पना सोनवणे लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होणार असून शनिवार (दि.१२) रामपूर वाडी पंचक्रोशीत हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

 

रामपूर वाडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान अवधूतचिंतन श्री.गुरुदेवदत्त यांची मूर्ती

त्यानिमित्ताने सोमवार (दि.१४) ते (दि.२१) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असून या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.२१) सरला बेटाचे मठाधिपती महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य वाणीतून कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.दिनांक (दि.६) ते (दि.२१) वरील प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रामपूरवाडी ग्रामस्थांनी दिली आहे. आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांनी भरभरून वर्गणी जमा करून धार्मिक कार्यात हातभार लावून पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन समस्त रामपूरवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!