
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता- जळगाव (ता.राहाता) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार (दि.१) फेब्रुवारी रोजी ‘बाल आनंद बाजार’ मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. कौतुकास्पद उपक्रमाद्वारे बाल आनंद बाजारात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासह आर्थिक व्यवहाराचे धडे गिरवले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.गोरक्षनाथ चौधरी उपाध्यक्ष श्याम चौधरी, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब चौधरी,पत्रकार बाबासाहेब चौधरी,माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र चौधरी,रवींद्र चौधरी,विजय चौधरी,बाळासाहेब चौधरी,सतीश चौधरी,राहुल चौधरी,किरण वैराळ, खंडेराव वाघ,सचिन चौधरी,गणेश गुजांळ,आनंद गायकवाड आदिनाथ कापरे, जळगाव शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अहिरे उपशिक्षिका मेघा बागुल,उपशिक्षक मारुती खरात,संतोष हेकरे आदींसह माता पालकसंघ,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व जळगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उत्साही वातावरणात ‘बाल आनंद बाजाराचे’ उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल शाळेच्या प्रांगणामध्ये मांडण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी शेतामधून ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता.याचबरोबर विविध प्रकारचे स्नॅक्स, इडली, पोहे, डोसा, पॉपकॉर्न,पोंगा, अप्पे,समोसा, पाव वडा,नूडल्स,पोहे, शिरा,भेळ, असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थांनी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते.
यावेळी ग्रामस्थांनी ही सर्व खाद्यपदार्थावर ताव मारला.बाल आनंद बाजाराच्या माध्यमातून लहानग्या चिमुकल्यांनी बाल वयात शिक्षण करत असताना आर्थिक ऊलाढल काय असते? बाजारपेठेत आर्थिक व्यवहार कसे केले जातात व्यवसायामध्ये नफा-तोटा काय असतो याबद्दल माहिती घेतली.यावेळी पालकांनी आपल्या पाल्याची व्यवहारिक परीक्षा घेऊन त्यांच्या कडून खाद्य पदार्थ खरेदी करून कौतुकांची थाप दिली याप्रसंगी अंगणवाडी मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बाल आनंद बाजारामध्ये सहभागी होऊन खाद्यपदार्थांची आनंदाने खरेदी केली.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद बाजारामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेतला खाद्यपदार्थांची विक्रमी विक्री करून त्यातून निव्वळ नफा मिळवला जळगावकर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी थाटलेल्या स्टॉल्सवर खरेदी केली यामुळे आनंदी झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनाला भिडला होता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्व काही सांगत होता.यावेळी आर्थिक उलाढाल काय असते याची माहिती विद्यार्थ्यांना अवगत झाली.
यावेळी या आनंद बाजारामधून १५ हजार रुपयाची आर्थिक उलाढाल झाली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अहिरेउपशिक्षिका, मेघा बागुल उपशिक्षक संतोष हेकरे,मारुती खरात यांनी बाल आनंद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी जळगाव ग्रामस्थांनी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष सदस्य यांच्यासह माता-पालक संघाने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
