
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –शैक्षणिक क्षेत्रामध्ये पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल करणार्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने विद्यार्थीनीसाठी निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शाळा आणि वस्तीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कन्या विद्या सुरू आहे.या शाळेने राखलेली गुणवता आणि केलेली यशस्वी वाटचाल पाहाता राज्यातून प्रवेश घेण्यासाठी पालक येतात.मात्र प्रवेशाच्या मर्यादा असतात.यासाठी संस्थेने विद्यार्थीनीसाठी निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय केला असून सर्व सुविधांनी परीपूर्ण आशी इमारत तसेच वस्तीगृहाची सुविधा निर्माण केली जाणार असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार गुणवतापूर्ण शिक्षण दिले जाते. संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंमलबजावणी केली जाते.मुलींसाठी सुसज्ज असे वस्तीगृह असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून निवासी शाळा आणि वस्तीगृहाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ.विखे पाटील म्हणाल्या
शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार भाऊसाहेब वाकचौरे आ. अमोल खताळ, आ, विठ्ठलराव लंघे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे यांच्यासह प्राचार्य आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवासी शाळा त्याचबरोबर चारशे मुलींची सोय होईल असे वस्तीगृह सर्व सुविधांनी परीपुर्ण असणार आहे. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती देत असताना ही निवासी शाळा आणि वस्तीगृह कसे असणार आहे.याविषयीची सविस्तर माहिती मंत्री गडकरी यांना दिली.
