कोपरगाव तालुकागुन्हेगारी

कोपरगाव शहरात विविध ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी केली सुटका

कारवाईत ५२५ किलो गोमांस व ३० जनावरांची कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकुण १ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

प्रतिनिधी- अक्षय काळे 

कोपरगाव – कोपरगाव शहरात विविध ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जाणवरांची कोपरगाव शहर पोलिसांनी सुटका केली आहे.शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर कोपरगाव शहर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून ६ गोवंश जनावरांची सुटका केली आहे.यांचबरोबर ५२५ किलो गोमांस व ३० जनावरांची कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकुण १ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला वेगवेगळया कलमा अन्व्येय एकुण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 

सविस्तर हकीकत अशी की,,दि.18 रोजी पोलीस निरीक्षक,भगवान मथुरे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमी मिळाली की, आयशा कॉलनी, कोपरगाव येथे गो वंश जनावरांची कत्तल होत आहे. तसेच कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवलेले आहे. अशी बातमी मिळाल्याने यांनी अधिनस्त अधिकारी सपोनि आशिष शेळके, सपोनि किशोर पवार, पोसई भुषण हांडोरे, पोहेको हांडोरे व अंमलदार पोहेको २५५० किशोर जाधव, पोहेको ११ एकनाथ लिंबोरे, पोहेकी ४६२ गोपीनाथ कांदळकर, पोहेकी १४४० दिगंबर शेलार, पोहेकॉ/२१८० दिपक रोकडे, पोना/२२४४ तुपे, पोको २५६३ गणेश काकडे, पोकों/२६३१ श्रीकांत कुन्हाडे, पोकों/२४३४ प्रकाश कुंढारे, पोकॉ/२५७९ किशोर कुळधर, पोको १९१४ गणेश मैड, म.पोको १८२५ मंजुश्री त्रिभुवन, मपोकों/२४०० विजया दिवे अशांना पोलीस ठाण्यात बोलावून घेवून सांगितले की, गोपनीय बातमी मार्फत बातमी मिळाली की, आयशा कॉलनी, कोपरगाव येथे गो वंश जनावरांची कत्तल होत आहे. जनावरे डांबून ठेवलेले आहे अशी माहीती मिळाली असून सदर ठिकाणी छापा टाकुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करायची असल्याने वरील अधिकारी व अंमलदार यांची पोनि भगवान मथुरे यांनी दोन पथक तयार करुन पथकासह आम्ही आयशा कॉलनी कोपरगाव येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता महेबूब कॉलनी, संजयनगर कोपरगाव येथे 15000/-रु किचे गोवंश जातीचे 02 जनावरे कत्तलीचे उद्येश्याने बांधुन ठेवलेले मिळून आले. सदरचे जनावरांचो लोकांचे मदतीने सुटका करुन गो शाळेत जमा केले आहे. सदर बाबत पोको 1914 गणेश मंड यांचे तक्रारीवरुन आरोपी तोहीद इरफान कुरेशी रा. संजयनगर, कोपरगाव यांचेविरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गुरजि नंबर 17/2025 म.प्रा.स.अधि. 1976 चे कलम 5,9 सह प्रा.निर्दयतेने वागविणेचा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) सह म.पो. का. क. 119 प्रमाणे करण्यात आला आहे.

 

आयशाकॉलनी, संजयनगर नगर या ठिकाणी 60,000/-रु किचे 03 गोवंश जातीचे जनावरे कत्तलीचे उद्येश्याने बांधून ठेवलेले मिळून आल्याने सदरचे जनावरांचे लोकांचे मदतीने सुटका करुन गो शाळेत जमा केले आहे. सदर बाबत पोकों/2631 श्रीकांत बाळु कुन्हाडे यांचे तक्रारीवरुन आरोपी नामे सत्तार गफार कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचेविरुध्द गु.रजि नंबर 18/2025 म.प्रा.स.अधि. 1976 चे कलम 5,9 सह प्रा. निर्दयतेने वागविणेचा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) सह म.पो.का.क.119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

त्यानंतर मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे कत्तल होत असलेल्या ठिकाणी हाजी मंगल कार्यालयाचे जवळ आयशा कॉलनी, कोपरगाव येथे जावुन खात्री केली असता पापा फकिरा महंमद कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे पत्राचे सेड मध्ये जनावरांची कत्तल केलेली होती. त्या ठिकाणी जनावरांचे ५० किलो मांस व २० कातडी, वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहीत्य असा एकुण १७,७००/-रु कि चा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेवुन गो मांस व जनावरांची कातडीचे सॅम्पल घेवुन कत्तलीचे साहीत्य, बाकी गो मांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरीता नगरपालीका कोपरगाव यांचे ताब्यात देवुन त्याची विल्हेवाट लावली आहे. सदर बाबत पोकों/२५६३ गणेश वशिष्ट काकडे यांचे फिर्यादीवरुन आरोपी पापा फकिरा महंमद कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे विरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गु.रजि नंबर १९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९ सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

तसेच हाजी मंगल कार्यालयाचे पाठीमागे रोडचे कडेला आयशा कॉलनी, कोपरगाव येथे सोनु मज्जु कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे पत्राचे सेड मध्ये जावुन झडती घेवुन खात्री केली असता, त्या ठिकाणी गांवंश जनावरांची कत्तल केलेली होती, त्या ठिकाणी जनावरांचे ४० किलो गो मांस व १० जनावरांची कातडी व कत्तलीसाठी लागणारे साहीत्य असा एकुण १०,०००/-रु कि चा मुद्येमाल मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन गो मांस व जनावरांची कातडीचे सॅम्पल घेवून बाकी मांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरीता नगरपालीका कोपरगाव यांचे ताब्यात दिले आहे. सदर बाबत पोको १९४९ तुपार विलास कानवडे यांचे फिर्यादीवरुन आरोपी सोनु मज्जू कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे विरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गू.रजि नंबर २०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५.९ सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

 

आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव येथील मटन मार्केट या ठिकाणी छापा टाकला असता, सदर टिकाणी आरोपो नामे १) सोनू मज्जु कुरेशी रा.संजयनगर, कोपरगाव २) पापा फकीरा महमंद कुरेशी रा संजयनगर, कोपरगाव ३) शबीर बशीर कुरेशी रा. सुभाषनगर, कोपरगाव ४) सत्तार गफार कुरेशी रा. आयशा कॉलनी, कोपरगाव, ५) तोहोद इरफान कुरेशी रा. आयशा कॉलनी, कोपरगाव यांचे कब्जात गो वंश जातीचे ४२५ किलो गो मां व कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकूण ६५,६००/-रु कि चा मुद्येमाल मिळून आल्याने सदरचे गो मांस व कातडी मधुन संम्पल राखून ठेवून बाकी गो मांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरीता नगरपालीका कोपरगाव यांचे ताव्यात दिले आहे. सदर बाबत पोकों/२५७९ किशोर विठ्ठल कुळधर यांचे तक्रारीवरुन आरोपी विरुध्द कोपरगाव शहर पो.स्टे गुरजि नंबर २१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९ सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

एकंदरीत आज दिनांक १८/०१/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहीती प्रमाणे आयशा कॉलनी, संजयनगर कोपरगाव परिसरात व मटन मार्केट या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीसांनी छापा टाकून ०६ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. ५२५ किलो गो मांस व ३० जनावरांचे कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकुण १,६८,३०० /- रु.कि.चा. मुद्देमाल जप्त केला असुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपीताविरुध्द वेगवेगळया कलमा खाली एकुण ०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

सदरची कारवाई श्री. राकेश ओला सो, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबमें सो, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. शिरीष वमने सो.शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली, पो. नि. भगवान मथुरे, स.पोनि. आशिष शेळके, सपोनि किशोर पवार, पोसई किशोर हांडोरे, पोहेकॉ/2550 किशोर जाधव, पोहेकों/दिपक रोकडे, पोहेकॉ/लिंबोरे, पोहेकॉ/दिंगवर शेलार, पोहेकों/कांदळकर, पोना/तुकाराम तुपे, पोकॉ/2563 गणेश काकडे, पोकों/गणेश मैड, पोकों/प्रकाश कुंडारे, पो पोकों/किशोर कुळधर, मपोकों/मंजुश्री त्रिभुवन, मपोकों/विजया दिवे, सर्व नेमणुक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!