
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित असणाऱ्या टिळकनगर इंडस्ट्रीज विदेशी मद्य उत्पादक कंपनीमधील इन्स्ट्रुमेंट इंजिनीयर म्हणून कार्यरत असलेले श्री.विष्णुपंत शंकर शेळके यांची नुकतीच सेवानिवृत्ती झाली.त्यांनी एकूण 13 वर्ष प्रदीर्घ सेवा दिली.यावेळी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त टिळकनगर इंडस्ट्रीजतर्फे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.त्यांनी केलेल्या दीर्घ सेवेसह कार्यक्षमता आणि निष्ठेबद्दल सहकाऱ्यांनी भेटवस्तू देत पेढे भरवत त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
श्री.विष्णूपंत शेळके हे सध्या श्री.गणेश सहकारी साखर कारखाना, गणेशनगरचे संचालक असून वाकडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचेही ते संचालक आहेत.घरची शेती सांभाळून ते राजकारणा सह समाजकारणात उस्फुर्तपणे काम करत आहेतत्यांचा साधेपणा, मैत्रीपूर्ण स्वभाव,आणि नेहमी मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे ते परिसरात एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
विष्णुपंत शेळके यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इलेक्ट्रॉनिक व्यवसायातून केली. 1992 साली राहाता येथे ‘प्रियदर्शनी इलेक्ट्रॉनिक्स’ नावाने इलेक्ट्रॉनिक दुकान सुरू केले. यामध्ये त्यांनी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वायरिंग, रिपेअर्स आदी सेवा ग्राहकांना दिल्या. त्यांच्या प्रामाणिक व्यवहारामुळे आणि वेळेच्या शिस्तीमुळे त्यांनी राहाता तालुक्यात व्यवसायात स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
1992 ते 2008 हा कालावधी शेळके यांच्या व्यवसायासाठी सुवर्णकाळ ठरला. मात्र, 2008 साली नगर-मनमाड महामार्ग चौपदरी करण्याच्या कामात त्यांच्या दुकानावर अतिक्रमण झाल्याने ते दुकान बंद करावे लागले. हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता, पण त्यांनी धैर्य न सोडता नव्या वाटा शोधल्या.2012 साली शेळके यांनी टिळकनगर इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये ‘इन्स्ट्रुमेंट इंजिनीयर’ पद स्वीकारले. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल विषयातील खोल ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी कंपनीच्या तांत्रिक प्रक्रियेत अनेक उपयुक्त बदल घडवून आणले. प्रकल्पांसाठी आवश्यक उपकरणांची निगा, देखभाल, आणि कार्यक्षम वापर हे त्यांनी उत्कृष्ट रीतीने हाताळले.त्यांची सातत्यपूर्ण सेवा,अचूकता,आणि गुणवत्तेवर असलेली निष्ठा ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. एक जबाबदार कर्मचारी, संयमी व्यक्तीमत्त्व आणि प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये होती.
यावेळी डेप्युटी जनरल मॅनेजर श्री महेश फणसाळकर. ईटीपी आणि सेफ्टी ऑफिसर श्री धायगुडे साहेब.एचआर मॅनेजर श्री.अमोल काळेसाहेब परचेस ऑफिसर श्री धनंजय भिसे साहेब अकाउंटंट श्री नकुल शिंदे साहेब टाईम ऑफिस श्री. संतोष बोराडे साहेब,सिक्युरिटी ऑफिसर श्री कवडे साहेब तसेच स्टोअर.इंजिनिअरिंग ऑफिस सिव्हिल ऑफिस जनरल ऑफिस इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्तीनंतरही श्री.शेळके सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.ते श्री.गणेश सहकारी साखर कारखाना,गणेशनगरचे संचालक म्हणून कार्यरत असून. सहकारी क्षेत्रातही प्रभावी काम करत आहेत.तसेच वाकडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कामातही त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
