शैक्षणिकसांस्कृतिक

चितळीगाव जी.प. शाळेने राहाता तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले   

चितळी ग्रामस्थांनी सर्व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

राहाता:(ता.२७) – राहाता तालुक्यातील चितळीगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावली.     

 राहाता येथे पार पडलेल्या वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत किलबिल गटात सौम्या मच्छिंद्र वाघ हिने प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत किलबिल गटात लावण्या गणेश चौधरी हिने द्वितीय क्रमांक व हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात माऊली अनिल खरात हिने द्वितीय क्रमांक संपादन केला.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक विश्वास टपळे, विश्वास चोखर,संजय आग्रे, दिपक अहिरे, सुजाता लांबाटे, सचिन विधाते यांचे मार्गदर्शन लाभले.   

 

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर, सरपंच नारायणराव कदम,उपसरपंच कविताताई पगारे, कायदेतज्ञ अशोकराव वाघ,विलासराव वाघ, दीपक वाघ, सोपान काका वाघ, विक्रम वाघ,शाळा व्यवस्थापन समितीचे निळकंठ वाघ, संगणक शिक्षण कैलास वाघ, प्रियांका गायकवाड, चंद्रकांत वाघ, पत्रकार अशोक वाणी यांच्यासह चितळी ग्रामस्थांनी सर्व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

“राहाता येथे पार पडलेल्या वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत किलबिल गटात सौम्या मच्छिंद्र वाघ हिने प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत किलबिल गटात लावण्या गणेश चौधरी हिने द्वितीय क्रमांक व हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात माऊली अनिल खरात हिने द्वितीय क्रमांक संपादन केला.”

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!