(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
कोपरगाव:(ता.२४) -कोपरगाव नगरपालिकेचे माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन (तबला वादक) रंगमंच कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाचे व पारितोषिक समारंभ २०२४-२५ चे मंगळवार (ता.२४) डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शबाना शेख नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व जगप्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण स्व. उस्ताद जाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहत रंगमंचाचे पूजन करून व दीप प्रजवलन करण्यात आले.
यावेळी नगरपालिका सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळे, बांधकाम विभागाच्या श्रीमती प्रधान मॅडम, सखी सावित्री मंचच्या सदस्या वर्षा झंवर, ऍड श्रद्धा जवाद, आशासेविका मंगल गवळी, ज्योती मरसाळे, प्रीती बनकर व नगरपालिका शिक्षण मंडळ विविध शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक तसेच शाळेचे स्कूल बस चालक सुरेश काळे, वॉचमन पंकज कोपरे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना खैरनार, स्वागत व सूत्रसंचालन अर्चना बोराडे तर आभार आभार प्रमोद लष्करे यांनी मानले आहे. ,
यावेळी विविध स्पर्धेत तसेच शालांत परीक्षेत विशेष यश संपादित करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी विविध कलाविष्कार, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक विद्यार्थी यांचे मने जिंकली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यालयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. यावेळी माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
